शनिदेव, हनुमान मंदिर येथील दानपेटी चोरणारे चोर अटकेत

By Raigad Times    02-Dec-2021
Total Views |
chori_1  H x W:
 
जेएनपीटी । उरण शहरातील स्वामी विवेकानंद चौक एकदंत सोसायटी जवळील शनिदेव, हनुमान मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी उरण पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
1 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी उरण शहरातील विवेकानंद चौक एकदंत सोसायटी जवळील शनिदेव,हनुमान मंदिरातील दान पेटी अंधाराचा फायदा उठवून लंपास करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सदर दानपेटी चोरीचे फुटेज मंदिरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले.
 
उरण पोलीस यंत्रणेला सदर मंदिरातील दानपेटी चोरी संदर्भात माहिती मिळताच उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणेने दानपेटी चोरीचे फुटेज मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेरातून घेत युद्ध पातळीवर तपास सुरू केला. आणि काही तासांच्या कालावधीतच मंदिरातील दानपेटी चोरी प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत असल्याची माहिती पोलीस अधिकारी युवराज जाधव यांच्या कडून माहिती प्राप्त होत आहे.