सुधागडः अल्पवयीन मुलीवर बलात्कार; तरुण अटकेत

15 Dec 2021 16:08:58
balatkar in pali_1 &
 
 
 सुधागड-पाली | सुधागड तालुक्यातील गोकुळवाडा येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी युवकाला पाली पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
 
पीडित अल्पवयीन मुलगी ही माथेरान येथे राहणारी असून सध्या ती सुधागड तालुक्यातील गोकुळवाडा येथे आपल्या नातेवाईकांकडे रहायला आली होती. नेरळ, जि.रायगड येथे राहणार्‍या १९ वर्षीय युवकाने गोकुळवाडा येथे मुलीच्या घरी जाऊन तिच्या सोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केला व घडला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
 
 
याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर सदर तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शुक्रवार (ता.१७) पयरत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती पाली पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी दिली.
 
 
Powered By Sangraha 9.0