मुरुड समुद्रकिनार्‍यावर मनसेने राबविली स्वच्छता मोहीम

By Raigad Times    12-Dec-2021
Total Views |
Murud Beach_1  
 
कोर्लई (राजीव नेवासेकर) । मुरुड समुद्रकिनार्‍यावर मनसे कार्यकर्त्यांनी शनिवारी (11 डिसेंबर) स्वच्छता मोहीम राबिवली. या मोहिमेत किनार्‍यावरील कचरा गोळा करुन, किनारा स्वच्छ करण्यात आला.
महाराष्ट्राला लाभलेल्या 720 कि.मी.लांबीच्या किनारपट्टीवरील चाळीसहून अधिक समुद्रकिनार्‍यांची एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले होते. त्याचाच भाग म्हणून शनिवारी मुरुड येथे असंख्य मनसे कार्यकर्त्यांनी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविली.

Murud Beach_2  
 
कामगार सेनेचे सरचिटणीस स्वप्नील कारभारी जनहित कक्ष, माजी तालुका अध्यक्ष अरविंद गायकर, तालुका अध्यक्ष महेंद्र शेडगे, शहर अध्यक्ष जगन पुलेकर, विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष युवराज भगत तसेच विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते, महाराष्ट्र सैनिक यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.