रोहा : मुठवली खुर्द येथील स्मशानभूमीचे काम मार्गी लागणार

आ. अनिकेत तटकरे 7 लाखांचा निधी उपलब्ध

By Raigad Times    03-Nov-2021
Total Views |
muthavle _1  H
 
खांब-रोहे । रोहे तालुक्यातील मुठवली खु. येथील स्मशानभूमी कामाकरिता विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे यांच्या निधीतून 7 लाखांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
 
तालुक्यातील गावागावात स्मशानभूमींची विकासकामे पूर्ण झाली आहेत. मात्र मुठवली खुर्द येथील स्मशानभूमीला कोणीही वाली नव्हता. बदलते राजकारण व नेतृत्व यामुळे या ग्रामपंचायतीला आ.अनिकेत तटकरे यांचे नेतृत्व लाभले. मालसई ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्यावर मुठवली ग्रामस्थांनी स्मशानभूमी विकासकामाची कैफियत आ.अनिकेत तटकरे यांच्याकडे मांडली होती.
 
त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, आ.अनिकेत तटकरे यांनी 7 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिल्याने रखडलेल्या स्मशानभूमीचे विकासकाम मार्गी लागणार आहे. 7 लाखांचा निधी उपलब्ध करुन दिल्या असल्याबाबतचे पत्र ग्रामस्थांना सुपूर्द करण्यात आले आहे. याबद्दल ग्रामस्थांनी आ. तटकरे यांचे आभार मानले आहेत.