पोयनाड-नागोठणे रोडवर अपघात; एक ठार, एकजण जखमी

जखमींना चिखली आरोग्य केंद्राबाहेर तासभर ताटकळत ठेवल्याचा राजा केणी यांचा आरोप

By Raigad Times    29-Nov-2021
Total Views |
poynad nagothane rode_1&n
अलिबाग । पोयनाड-नागोठणे रोडवर झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. आरोग्य केंद्रातील कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाला जीव गमवावा लागल्याचा आरोप शिवसेना तालुकाप्रमूख राजा केणी यांनी केला आहे.
पोयनाड नागोठणे रस्त्यावरील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रा पासून फक्त 1 की.मी. अंतरावर हा अपघात झाला. या अपघातात जखमी विकास मिसाळ आणि त्याच्या सहकार्‍याला जखमी अवस्थेतच शेजारच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात हवलण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मिसाळ याला मृत घोषीत केले.
 
दुसर्‍या अपघातग्रस्त इसमाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला जे.जे. रुग्णालय मुंबई येथे हालवण्यात आले आहे. दरम्यान, या अपघतातील इसमाचा मृत्यू चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळेच झाल्याचा आरोप शिवसेनेचे तालुका प्रमुख राजा केणी यांनी केला आहे.
 
जखमी इसमांना आरोग्य केंद्राबाहेर तासभर रखडवण्यात आले. जर चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर हजर असता आणि डॉक्टर व कर्मचार्‍यांनी वेळेवर उपचार केले असते तसेच 1 तास व्यर्थ गेला नसता आणि विकास मिसाळ यांना प्राण गमवावे लागले नसते असे राजा केणी यांनी म्हटले आहे.