खारघर रेल्वे स्थानकातील रिक्षा स्टँडला अनधिकृत वाहन पार्कींगचा विळखा

By Raigad Times    27-Nov-2021
Total Views |
PARKING_1  H x
पनवेल | खारघर रेल्वे स्टेशनवर ‘सिडको’ ने रिक्षा वाहनतळासाठी भूखंड उपलब्ध करुन दिले आहेत. मात्र, सदर भूखंडावर वाढलेले गवत आणि रिक्षा स्टँडच्या जागी दुचाकी वाहने उभी केली जात असल्यामुळे रिक्षाचालक आणि दुचाकी चालकांमध्ये वाद उफाळून येत आहे. ‘सिडको’ ने दुचाकी वाहनचालांवर कारवाई करुन रिक्षा स्टँडमधील गवत काढून रिसर स्वच्छ करावा, अशी मागणी ‘एकता रिक्षा संघटना’ने सिडको परिवहन विभाग अधीक्षकांकडे पत्राद्वारे केली आहे.
 
तळोजा आणि खारघर परिसरात जवळपास दोन हजार रिक्षा आहेत. ‘सिडको’ने खारघर रेल्वे स्थान ातील प्रवेशद्वारच्या दोन्ही बाजूला रिक्षा वाहनतळसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, या दोन्ही वाहनतळवर मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. ‘सिडको’ ने दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी खारघर रेल्वे स्थानकाच्या छतावर वाहनतळाची सोय केली आहे. मात्र, दुचाकी चालक रिक्षा वाहनतळाच्या जागेवर वाहने उभी करुन प्रवासासाठी निघून जात असल्यामुळे रिक्षा चालकांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. तर अनेक वेळा वाहने उभी करताना रिक्षा चालक आणि दुचाकी चालकामध्ये दैनंदिन किरकोळ वादाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सिडको परिवहन विभागाने दुचाकी वाहन चालकांवर कारवाई करून रिक्षा वाहनतळच्या जागेवर वाढलेले गवत काढून वाहनतळ परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी ‘एकता रिक्षा संघटना’चे उपाध्यक्ष कमलाकर ठावूर यांनी सिडको परिवहन विभाग अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
 
दरम्यान, खारघर रेल्वे स्थानकातील वाहनतळावरील गवत काढले जाईल. तसेच वाहनतळावर अनधिकृतपणे दुचाकी पार्क करणार्या वाहन चालकांवर कारवाई करण्याची सूचना खारघर वाहतूक विभागाला करण्यात येईल, असे सिडको अधिकार्‍यांनी सांगितले.