पनवेल-अंधेरी लोकल आता गोरेगांवपर्यंत धावणार!

प्रवासी संघ पनवेल संघटनेच्या पाठपुराव्याला यश

By Raigad Times    27-Nov-2021
Total Views |
local _1  H x W
 
पनवेल| मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेलअंधेरी ही लोकल सेवा २ ऑक्टोबर २००७ पासून सुरू झाली व प्रवासी संघातर्फे पहिल्या फेरीला हिरवा बावटा दाखविण्यांत आला होता. त्यानंतर पहिल्या फेजमध्ये गोरेगांवपर्यंत व दुसर्‍या फेजमध्ये ही सेवा बोरीवलीपर्यंत विस्तारीत करण्याचे रेल्वे प्रशासनाचे सन २०१० ते २०१४ पर्यंतचे उद्दिष्ट असल्याने एमआरव्हीसी रेल्वे प्रशासनांचे युद्ध पातळीवर काम चालू होते. परंतू अभियांत्रिकी काही ता त्रिक अडचणींमुळे प्रकल्प रखडला गेला परंतु प्रवासी संघातर्फेपत्र व्यवहार, प्रत्यक्ष भेटीद्वारे सतत पाठपुरावा रेल्वे प्रशासनांकडे आजपर्यंत चालू होता.
 
पनवेल-अंधेरी लोकलच्या सद्यस्थितीत ९ अप व ९ डाऊन अशा एकूण १८ फेर्‍या धावत आहेत. प्रवासी संघ व रेल्वे स्थानक स्थानिय सल्लागार समिती सदस्य, उपनगरीय सल्लागार समिती सदस्य, झेड आर यु.सी.सी व एन आर यु सी.सी सदस्य यांच्या सर्वांतर्फे पनवेल-गोरेगांव पर्यंत धावणार्‍या फेर्‍यांमध्ये सकाळ संध्याकाळ या कालावधीत फेर्‍यांमध्ये वाढ करावी, असे लेखी निवेदन व चर्चा होऊन रेल्वे प्रशासनाकडून तत्वतः मान्यता पण मिळालेली आहे. सुधारीत वेळापत्रक बनविण्याचे रेल्वे प्रशासनाचे युद्धपातळीवर काम चालू आहे.
 
१ डिसेंबरपासून पनवेल-अंधेरी लोकल रेल्वे सेवेचे विस्तारीकरण गोरेगांवपर्यंत करण्याचे त्याचप्रमाणे पनवेलगोरेगांव रेल सेवेचे सुधारीत वेळापत्रक त्याच दिवशी प्रवासी बांधवांना वितरीत करण्याचा रेल्वे प्रशासन व प्रवासी संघातर्फे प्रयत्न चालू आहे. या मार्गावरील सर्व प्रवासी बांधवांचा प्रवास आरामदाई, सुखकारक, आर्थिक बचत यामुळे सर्व प्रवासी बांधव यांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे प्रवासी संघाचे कार्यवाह व उपनगरीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत बापट यांनी आमच्या पत्रकार बंधूना सांगितले.
 
प्रवासी संघाचे अध्यक्ष व पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य डॉ.भक्तिकुमार दवे व झेड.आर.यु. सी.सी सदस्य अभिजीत पाटील यांच्या हस्ते पनवेल रेल्वे स्थानकावरून पहिल्या रेल्वे लोकल सेवेला हिरवा बावटा दाखविण्यात येईल. प्रवासी संघातर्फे सर्व प्रवासी बांधवांना कार्यक्रमाला येताना कोरोना-१९ चे शासकीय नियमांचे पालन करून मास्क लावणे व सॅनिटायझरने हात स्वच्छ करुन पनवेल रेल्वे स्थानकात प्रवेश करावा, असे आवाहन करण्यांत आले आहे.