हनुमान कोळीवाडा गावच्या पुनर्वसनाचा प्रश्नमार्गी लागणार?

पुनर्वसित जागेची प्रशासनाकडून पाहणी

By Raigad Times    27-Nov-2021
Total Views |
hanuman koli vada_1 
 
 उरण | उरण तालुक्यातील बहुचर्चित हनुमान कोळीवाडा गावच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लागण्याची शक्यता आहे. त्या दिशेने प्रशासनाकडून वेगवान हालचाली सुरु झाल्या आहे. याकरिता पुनर्वसितजागेची प्रशासनाकडून नुकतीच पाहणी केली. त्यामुळे ग्रामस्थांनी १ डिसेंबरला पुकारलेले आंदोलन फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलले आहे.
 
जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली १७ नोव्हेंबर रोजी हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळासोबत बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी जेएनपीटीच्या जसखार येथील भराव केलेल्या मिनीत शासनाने सन १९८५ शासन निर्णयाने शेवा (हनुमान) कोळीवाडा गावातील ८६ शेतकरी, १७० बिगर शेत री असे एकूण २५६ कुटुंबांना भूखंड जमीन वाटपाचे अ णि शासनाच्या मापदंडाने नागरी सुविधा देण्याच्या कामाची जबाबदारी उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके, उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्यावर सोपविली होती.
 
त्या अनुषंगाने तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, जेएनपीटी प्रशासनाचे अधिकारी राजेश फडके, न्हावा शेवापोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे अणि इतर अधिकारी यांनी कस्टम वसाहतीजवळील जेएनपीटीच्या विकसित जमिनीत शासनाच्या मापदंडानुसार ७१० गुंठ्यांत २५६ भूखंड आणि शासनाच्या मापडंदानुसार नागरी सुविधा देण्याचे मान्य व कबूल केले आहे. यावेळी सदर जमिनीची पाहणी शासकीय अधिकारी व हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांनी केली.
 
३७ वर्षे लढा, संघर्ष केला असता आता कठेतरी प्रशासनातर्फे हालचाल होऊ लागली आहे. मात्र हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांची जर शासनाने फसवणूक केली तर २६ फेबु्रवारी रोजी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामसुधारणा मंडळ हनुमान कोळीवाडा, पुनर्वसन कमिटीने प्रशासनाला दिला आहे.
 
पुनर्वसनाचे काम करण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांनी, प्रशासनाने वेळ मागितल्याने हनुमान कोळीवाडा म दिरात हनुमान कोळीवाडा ग्रामस्थ मंडळ, पुनर्वसन कमिटी यांची तातडीने बैठक झाली. या बैठकीत १ डिसेंबर रोजी होणारे आंदोलन २६ फेब्रुवारीला ठेवण्याचे एकमत झाले. तसे निर्णयही जाहीर करण्यात आला. त्यामुळे हनुमान कोळीवाड्याचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.