माणगाव बस अपघातः रायगड किल्ल्यावर पर्यटन करुन परतत असताना झाला अपघात; सर्व कर्जत तालुक्यात राहणारे

27 Nov 2021 06:44:18
mangoan bus apghat_1 
माणगाव । माणगावजवळ निजामपुर पाचाड रोडवर एका बसला अपघात झाला आहे. या अपघात एका मृत्यू झाला असून 35 प्रवासी जखमी आहेत. यातील सहा प्रवासी गंभिर आहे. हे सर्वजण रायगड किल्ल्यावर पर्यटन करुन परतत होते. एका अवघड वळणार बस चालकाचा बसवरील त्याचा ताबा सुटून हा अपघात झाला आहे.
 
mangoan NEWS_1  
 
कर्जत तालुक्यातील बोरिवली गावातील 40 जणांचा ग्रुप रायगड किल्ला पाहण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी पहाटे तिन वाजता गेले होते. किल्ला पाहील्यानंतर त्यांनी पाचाड येथील जिजाऊमाता समाधीचे दर्शन घेतले आणि पाचाड-माणगाव मार्गे घरी परतत होते.
संध्याकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास पळसगाव गावच्या हद्दीतील एका अवघड वळणाचा चालकाला अंदाज आला नाही आणि पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एक ठार, 27 किरकोळ जखमी, सहा गंभीर जखमी झाले. उर्वरित प्रवासी पर्यटक बचावले सदर अपघातात विजय भगवान नागरे वय 24 हा जागीच ठार झाला.
 
गंभीर जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले. किरकोळ जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर इंगोले व त्यांचे सहकारी यांनी उपचार केले. या अपघातात छाया सुरेश भोइर 45, प्रतिक्षा विजय भोइर 20, कविता दत्ता भोईर 38, वेदिका नरेश भोईर 14, साक्षी संतोष भोइर 14, स्नेहा नरेश भोईर 18, प्रथमेश भोईर 12, सरिता गणेश भोइर 40, स्वप्नाली चंद्रकांत भोईर 22, राही पांडू कंडवे 45, रामनाथ नारायण कारखिले 22, अर्चना रविंद्र भोईर 34, रेश्मा ज्ञानेश्वर तीखंडे 33, विजय शंकर भोईर 50, राम शंकर भोईर 55, यांचा जखमीत समावेश आहे.
 
सदर अपघाताची माहिती मिळताच माणगाव उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी एकच धाव घेतली, यावेळी माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर व त्यांचे पोलीस सहकारी यांनी तातडीने जखमींना मदत केली. त्याच बरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे, शहराध्यक्ष महामूद धुंदवारे, माजी सभापती संगीता बक्कम त्याचबरोबर अनेक मान्यवर यावेळी जखमींसाठी धाउन आले. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.
Powered By Sangraha 9.0