माणगावजवळ बसला भीषण अपघात; १ ठार तर 35 प्रवासी जखमी

By Raigad Times    26-Nov-2021
Total Views |
mangoan bus apghat_1 
 
कर्जत / माणगाव । माणगावजवळ निजामपूर-पाचाड मार्गावर एका बसला अपघात झाला आहे. या या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 35 प्रवासी जखमी आहेत. यातील सहा प्रवाशी गंभीर असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.
 
अपघातग्रस्त बसमधील प्रवासी कर्जत तालुक्यातील नेरळ येथील रहिवासी आहेत. एम.एच 04 एफ के 7799 या क्रमांकाच्या बसने ते रायगड किल्ल्यावर पर्यटनासाठी गेले होते. त्यांची बस निजामपूर-पाचाड मार्गावर आली असता एका वळणावर हा अपघात झाला. यात चालकाचा मृत्यू झाला आहे. बसमधील 37 प्रवाशांपैकी 6 प्रवाशी गंभीर असल्याची माहिती आली आहे.

mangoan bus apghat_1 
mangoan bus apghat_1 
mangoan bus apghat_1