अलिबाग । महाराष्ट्र, गोवा व गुजराथ या तीन राज्यांच्या बालरोगतज्ञांचे अधिवेशन काशीद (मुरुड) येथे होत आहे. या अधिवेशनानिमित्त आजपासून अलिबाग येथे विविध प्रशिक्षण कार्यशाळा आयोजन करण्यात आल्या आहेत.
मुले अशी का वागतात? या विषयावर आज (दि.25 नोव्हेंबर) संध्याकाळी पी.एन, पी. सभागृह येथे तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन होणार आहे. परिचारिकांकरीता नवजात बालकांची शुश्रूषा (जिल्हा परिषद सभागृह), पोलीस कर्मचार्यांकरिता जीवनरक्षक उपचार पद्धती (जंजिरा सभागृह), किशोरवयीन मुलांच्या समस्या (पी.एन. पी.विद्यासंकुल) गुदमरलेल्या बालकांच्या समस्या आर. पी. वर्कशॉप (मॅपल इन हॉटेल), लहान मुलांच्या आजारावर उपचार या संदर्भात तज्ज्ञांचे मार्गदशर्न जिल्हा परिषद सभागृह सभागृह होणार आहे.
या सर्व कार्यशाळांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन या अधिवेशनाचे प्रमुख संयोजक, डॉ. हेमंत गंगालिया, समन्वयक डॉ. चंद्रशेखर दाभाडकर, डॉ. विनायक पाटील व डॉ. राजेंद्र चांदोरकर यांनी केले आहे.
अधिक माहितीकरिता डॉ. विनायक पाटील व डॉ. राजेंद्र चांदोरकर यांचेशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे.