धक्कादायकः माणगावजवळ गावठी हातबॉम्बचा स्फोटा; एकाचा जागीच मृत्यू

10 वर्षीय मुलगा गंभीर, महिला किरकोळ जखमी ; घटनास्थळी 25 बॉम्ब सापडल्यामुळे खळबळ

By Raigad Times    24-Nov-2021
Total Views |
mangoan NEWS_1  
 माणगाव । तालुक्यातील निजामपूरजवळ गावठी हातबॉम्बच्या स्फोटात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक 10 वर्षीय मुलगा गंभीर असून महिला किरकोळ जखमी झाली आहे. घटनास्थळी 25 हातबॉम्ब सापडले आहेत. निजामपूर विभागातील चन्नाट रस्त्यावर मशीदवाडी गावच्या हद्दीत माळरानात शेतावर धामणी नदीजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
 
mangoan NEWS_1  
 
मयत संदेश आदिवासी चौहान (वय - 45), त्यांची पत्नी मजिनाबाई संदेश चौहान (वय -40), मुलगा सत्यम संदेश चौहान(वय -10) सर्व रा. सुरजासिंह 40 गाव बिराहली ता.रिथी जि.कठनी राज्य मध्यप्रदेश यांनी हे माणगाव तालुक्यातील मशीदवाडी गावच्या हद्दीत धामणी नदी शेजारी शेतातील माळरानात उघड्यावर राहत होते.
मंगळवार दि.23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास संदेश चौहान हा हात बॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला त्यामध्ये संदेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा सत्यम यास गंभीर दुखापत होऊन त्याची पत्नी माजीनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली. घटनेतील गंभीर जखमी झालेल्या मुलाला तात्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी औषधोपचाराकरिता आणण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केल्यावर त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्यास अधिक औषधोपचारासाठी एमजीएम रुग्णालय पनवेल येथे हलविण्यात आले आहे.
 
या घटनेची माहिती मिलताच रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांनीही माणगाव उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. तर रायगड जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, माणगाव तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी त्वरित आपल्या सहकार्‍यांसमवेत घटनास्थळाला भेट दिली.
 
घटनास्थळी काही अंतरावर एका झाडावर लपवुन ठेवलेले 25 गावठी हातबाँम्ब सापडले असुन मध्यप्रदेशातील हे लोक पारधी समाजाचे असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी प्रसार माध्यमांना दिली.
 
सदर घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येवून आरोपींवर भादवी सहिता कलम 286,337,338 स्फोटक कायदा कलम 4,5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास माणगाव पोलिस करीत आहेत.