रायगड : दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुखवट्याची प्रतिष्ठापना

By Raigad Times    23-Nov-2021
Total Views |
Diveaagar Suvarna Ganesh_
 
श्रीवर्धन । अंगारक संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आज (23 नोव्हेंबर) दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याची प्रतिष्ठापना करण्यात आली.

Diveaagar Suvarna Ganesh_
 
आजचा दिवस माझा व दिवेआगरमधील नागरिकांच्या जीवनामध्ये आनंद देणारा दिवस असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली. सकाळपासून येथे पूजा सुरु होती. अत्यंत उत्साही आणि आनंदी वातावरणात सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याचा पुनःप्रतिष्ठापना सोहळा पार पडला. येथील लोकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात पहायला मिळाला.
 
Diveaagar Suvarna Ganesh_
सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना करतानाच त्याच्या संरक्षणासाठी आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. जर कोणी चोरी करायचा प्रयत्न केला तर याठिकाणी असलेल्या आधुनिक यंत्रणा कार्यरत होतील. कर्कश्य आवाजाद्वारे नागरिकांना वेळीच कल्पना मिळेल व सर्व सतर्क होतील.

Diveaagar Suvarna Ganesh_
 
यावेळी दिवेआगर येथील दोन कोटींच्या नळपाणी योजनेचा शुभारंभ व दिवेआगर पोलीस चौकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याची पुन्हा प्रतिष्ठापना झाल्यामुळे तेथील भागाला नक्कीच गतवैभव प्राप्त होईल, असा विश्वास स्थानिक नागरिक करत आहेत.

Diveaagar Suvarna Ganesh_
 
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार भारत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते.