अलिबाग । एसटी हे सर्वसामान्यांचे वाहन आहे. विद्यार्थ्यांची अडचण आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकार म्हणून आम्ही प्रयत्नशिल आहोत. मात्र तुटेपर्यंत ताणू नका राजांनो...असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते आज (२३ नोव्हेंबर) श्रीवर्धन येथे बोलत होते.
दिवेआगर येथील सुवर्ण गणेश मुखवट्याची प्रतिष्ठापना आज अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात अजित पवार यांनी एसटी कर्मचारी संपावर भाष्य केले.
एसटी हे सामान्यांचे वाहन आहे. कर्मचार्यांनी संप पुकारलेला संप मिटावा, यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. काल याबाबत शरद पवारसाहेब यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब व अन्य नेत्यांची बैठक झाली यामध्ये एसटी पूर्ववत सुरु करण्यासाठी विविध अंगान चर्चा झाल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
एसटी हे सर्वसामान्यांचे वाहन आहे. विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने एक पाऊल मागे जाऊन विचार होणे आवश्यक आहे. मात्र तुटेपर्यंत ताणू नका राजांनो...असे आवाहनही त्यांनी केले.