अलिबाग । सदस्यांचे निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
अलिबाग तालुक्यातील झिराड, आवास, रेवदंडा, कुरकुंडी कोलटेंभी, बामणगाव, बेलकडे, ताडवागळे व काविर या ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक 21 डिसेंबर रोजी होणार आहे. मा.राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी जाहिर केलेला निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
नामनिर्देशनपत्र मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ-मंगळवार, दि.30 नोंव्हेंबर ते सोमवार दि. 06 डिसेंबर 2021 (दि.4 व 5 डिसेंबर 2021 या सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) , वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत. नामनिर्देशन छाननी करण्याचा दिनांक व वेळ-मंगळवार, दि.07 डिसेंबर 2021, सकाळी 11.00 वा.पासून छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा दिनांक व वेळ-गुरुवार, दि.09 डिसेंबर 2021 दुपारी 3.00 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ- गुरुवार, दि.09 डिसेंबर 2021 दुपारी 3.00 नंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक-मंगळवार, दि.21 डिसेंबर 2021, सकाळी 7.30 वा. पासून ते सायं.5.30 वा.पर्यंत, मतमोजणीचा दिनांक-बुधवार, दि.22 डिसेंबर 2021, सकाळी 11.00 वा., जिल्हा कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाचा अधिसूचना प्रसिध्द करणे दि.27 डिसेंबर 2021 सोमवार पर्यंत.