पुलावरुन ट्रेलर कोसळला; 1 ठार

गव्हाण फाटा येथील घटना

By Raigad Times    21-Nov-2021
Total Views |
accident_1  H x
 
उरण । उरण-पनवेल महामार्गावरील गव्हाण फाटा येथील पुलावरुन ट्रेलर कंटेनरसह रेल्वे रुळावर कोसळून झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाला. या अपघातामुळे 9 तास रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. त्याचा परिणाम जेएनपीटीच्या आयात निर्यातीवर होऊन कोट्यवधीचे आर्थिक नुकसान झाले आहे.
 
ही घटना शनिवारी (20 नोव्हेंबर) रात्री घडली. उरण-पनवेल महामार्गावरुन ट्रेलर कंटेनर घेऊन जात असताना गव्हाण फाटा नजीकच्या पुलावरुन ट्रेलर थेट रेल्वे रुळावर कोसळला. त्यामुळे ओव्हर हेड वायर तुटून रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. या अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

accident_2  H x
 
उरण परिसरात मोठ्या प्रमाणात उड्डाण पूलाची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु याकडे शासकीय व्यवस्थापनाकडून दुर्लक्ष होत आहे. काही दिवसांपूर्वी जासईजवळ उड्डाणपूलाचा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत कामगारांचा बळी गेला होता.
 
आता नव्याने वाहतूक सुरु करण्यात आलेल्या उड्डाण पुलावरुन शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मालाची वाहतूक करणारा ट्रेलर पलटी होऊन अपघात झाला.