जिल्ह्यात भात हमी भाव खरेदी केंद्रे ऑनलाइन नोंदणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

21 Nov 2021 14:26:47
kharedi krendra_1 &n
 
अलिबाग : भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणार्‍या रायगड जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या भाताची हमी भावाने भातविक्री करिता ऑनलाईन नोंदणीसाठी राज्य सरकारने आता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत 31 ऑक्टोपर्यंतच होती. त्यामुळे जवळपास 60 टक्के शेतकर्‍यांनी ही नोंदणीच केली नव्हती. ऑनलाईन नोंदणी मुदत वाढवून मिळावी अशी मागणी खा. सुनिल तटकरे यांनी सरकारकडे पाठपुरावा केल्याचे त्यांनी सांगितले.
 
रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात सहा ठिकाणी, पेण तालुक्यात सहा ठिकाणी, कर्जत तालुक्यात पाच ठिकाणी,रोहा तालुक्यात चार ठिकाणी, तर पोलादपूर तालुक्यात दोन आणि म्हसळा, पनवेल, खालापूर, सुधागड, श्रीवर्धन, माणगाव, महाड या तालुक्यात प्रत्येकी एका ठिकाणी भाताची हमी भावाने खरेदी केली जाणार आहे. त्याचवेळी जिल्ह्यात गोदामे उपलब्ध असलेल्या सहा ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन कडून सब एजंट नेमण्यात आले आहेत. यात पेण आणि माणगाव मध्ये प्रत्येकी एक आणि सुधागड तालुक्यात चार ठिकाणी हमी भावाने खरेदी केली जाणार आहे.
 
प्रत्यक्ष भाताची विक्री करण्यापुर्वी ऑनलाईन नोंदणी करण्याची सुविधा मार्केटिंग फेडरेशनने सुरु केलेली मुदत 30 ऑक्टोबर रोजी संपल्याने कापणीत गुंतुन राहिलेल्या शेतकर्‍यांना ऑनलाईन नोंदणी करता आलेली नाही. ही नोंदणी न झाल्यास शेतकर्‍यांना हमी भाव खरेदी केंद्रावर आपला भात विकता येणार नाही. त्यांना कमी दरात खाजगी व्यापार्‍यांना भात विकावा लागणार होता. त्यांना मोठया नुकसानीला सामोरे जावे लागणार होते. रायगड जिल्हयात भात खरेदी केंद्र सुरू झाली असली तरी ऑनलाइन नोंदणी नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत होती.
 
याबाबत राज्य सरकारने रायगडमघील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यात विविध 40 ठिकाणी भाताची हमी भावाने खरेदी केली जाणार असून 30 नोव्हेंबर पर्यंत भाताची ऑनलाईन नोंदणी करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सरकारच्या या मुदतवाढीचा लाभ रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, नाशिक या जिल्हयांतील भात पिकवणारया शेतकरयांनादेखील होणार आहे.
Powered By Sangraha 9.0