गाव तिथे काँग्रेस’ संकल्पना राबविणार-हनुमंत जगताप

By Raigad Times    02-Nov-2021
Total Views |
kongres_1  H x
 
पोलादपूर । महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नानासाहेब पटोले यांना अभिप्रेत असणारी ‘गाव तिथे काँग्रेस’ अशी संकल्पना महाड विधानसभा मतदार संघात राबविणार असल्याची ग्वाही महाड विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे नेते हनुमंत जगताप यांनी दिली.
 
पोलादपूर तालुक्यातील तुर्भे खुर्द येथे हनुमंत जगताप यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलादपूर पंचायत समितीचे उपसभापती शैलेश सलागरे, माजी सभापती दिलीप भागवत, मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर, महाड तालुका अध्यक्ष राजुशेठ कोरपे, रघुनाथ वाडकर, पोलादपूर शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल भुवड, ऍड. सचिन गायकवाड, मुन्ना खांबे, विष्णू उतेकर, जेष्ठ काँग्रेस नेते नथुबुवा उतेकर, अविनाश उतेकर, नामदेव उतेकर, मंगेश उतेकर, गोविंद उतेकर, तालुका युवक अध्यक्ष प्रवीण महाडिक, सहदेव उतेकर, संदेश साळवी, उदय पवार, ज्ञानदेव उतेकर, शांताराम साळुंखे, सरपंच शिवराम पवार, सुरेश थिटे, अतुल शेठ, विष्णू उतेकर, राकेश गोळे, एकनाथ भोसले इत्यादी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश उतेकर यांनी केले तर प्रास्तविक नामदेव उतेकर यांनी केले. यावेळी राजू कोरपे, दिलीप भागवत, शैलेश सलागरे यांची भाषणे झाली. शेवटी विष्णू उतेकर यांनी सगळयांचे आभार मानले.