तळाः विद्युत वाहिनीच्या धक्क्याने दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

By Raigad Times    19-Nov-2021
Total Views |
Bottom: Death of a ten ye
 
तळा । विद्युत वाहीनीचा धक्का बसल्यामुळे तळा तालुक्यातील एका दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ऋतिक यशवंत हिलम असे त्याचे नाव आहे.
 
गुरुवारी झालेल्या वादळी पावसाने तळा तालुक्यातील शेणवली गावाजवळ विजेची तार पोलावरून तुटून शेतात पडली होती. तार तुटली तरी विद्युत प्रवाह सुरु होता. आज (19 नोव्हेंबर) सकाळी ऋतिक (रा. खाम्बोली आदिवासी वाडी) खेळण्यासाठी शेतात गेला स्पर्श तारेला झाला.
 
यावेळी विजेचा जोरदार झटका बसलेल्या ऋतिकचा मृत्यू झाला आहे.