अलिबाग : आकर्षक विद्युत रोषणाईने ‘रामेश्वर’ उजळले...

18 Nov 2021 21:23:11
Rameshwar Temple Chaul-Al
 
अलिबाग । आज (18 नोव्हेंबर) त्रिपुरारी पौर्णिमा. कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाते. याच दिवशी महादेव शिवशंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे. म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात. या दिवशी शिवमंदिरात त्रिपूर वात लावली जाते.

Rameshwar Temple Chaul-Al
 
यानिमित्ताने अलिबाग तालुक्यातील चौल येथील प्रसिद्ध व पुरातन रामेश्वर मंदीर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून गेले आहे.

Rameshwar Temple Chaul-Al
 
डोळ्यांचे पारणे फेडणारे असे हे दृश्य आहे. मंदिरासमोरील तलावात मंदिराचे उमटलेले प्रतिबिंब द्विगुणित आनंद मिळवून जाते.

Rameshwar Temple Chaul-Al
 
अनेकांनी हे अप्रतिम दृश्य आपल्या कॅमेर्‍यात टिपत हे क्षण कैद केले.

Rameshwar Temple Chaul-Al
 
अशीच ही काही आकर्षक, अप्रतिम छायाचित्रे टिपली आहेत रेवदंडा येथील छायाचित्रकार महेंद्र खैरे यांनी.

Rameshwar Temple Chaul-Al
 
Rameshwar Temple Chaul-Al 
Powered By Sangraha 9.0