खालापूर नगरपंचायतीची सुधारीत आरक्षण सोडत जाहीर

तीन प्रभाग वगळता आरक्षण ‘जैसे थे’; सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांचा झाला हिरमोड

By Raigad Times    12-Nov-2021
Total Views |
Khalapur Nagar Panchayat
 
खोपोली (योगेश वाघमारे) । खालापूर नगरपंचायतीची सुधारीत आरक्षण सोडत आज (12 नोव्हेंबर) जाहीर करण्यात आली असून, तीन प्रभाग वगळता आरक्षण ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांचा हिरमोड झाला आहे.
 
खालापूर नगरपंचायतीची मुदत गतवर्षीच संपली आहे. 27 नोव्हेंबर 2020 रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार आरक्षणाची संख्या 50 टक्क्यांवर जायला नको, यासाठीच राज्य निवडणूक आयोगाने ना.मा.प्र. आरक्षणाची सुधारित सोडत काढण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता.
 
रायगउ जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार खालापूर नगरपंचायत सदस्यपदाच्या ना.मा.प्र. सुधारित आरक्षण सोडत आज तहसिल कार्यालयातील नेताजी पालकर सभागृहात कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, मुख्याधिकारी रश्मी शिंदे यांच्या नियंत्रणाखाली काढण्यात आली.
 
नव्याने सुधारीत आरक्षण सोडतीत अदलाबदल होतील, अशी आशा सर्वपक्षीय नेत्यांमध्ये होती. मात्र या नव्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्र.2, प्रभाग क्र.11 आणि 16 मधीलच आरक्षण बदलले आहे.उर्वरित आरक्षण ‘जैसे थे’ राहिले आहे. त्यामुळे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांचा हिरमोड झाला आहे.
------------------------------------------
खालापूर नगरपंचायत सुधारित आरक्षणरचना खालीलप्रमाणे :
 
1) साबाईनगर-अनुसूचित जाती (स्त्री किंवा पुरुष)
2) शिरवलीवाडी-नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला)
3) वनवेवाडी-सर्वसाधारण
4) निंबोडे-अनुसूचित जमाती (महिला राखीव)
5) दांडवाडी-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला राखीव)
6) वनवे-नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण)
7) पाटील आळी-नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला राखीव)
8) खडक आळी -अनुसूचित जमाती
9) मोरेवाडी - अनुसूचित जाती राखीव
10) बाजारपेठ -अनुसूचित जमाती महिला (राखीव)
11) चाळके आळी - सर्वसाधारण महिला (राखीव)
12) फराट आळी - सर्वसाधारण
13) कुंभार आळी-अनुसूचित जमाती राखीव
14) क्रांतिनगर -सर्वसाधारण (स्त्री किंवा पुरूष)
15) ब्राह्मण महड-नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला (राखीव)
16) गुरव आळी महड 2-सर्वसाधारण (स्त्री)
17) आदिवासीवाडी महड 3 - अनुसूचित जमाती महिला (राखीव)
 
आरक्षण सोडत कार्यक्रमादरम्यान सेनेचे नेते उमेश गांवड, शेकापचे संतोष जंगम यांनी विविध प्रश्न विचारले असता उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, मुख्याधिकारी रश्मी शिंदे यांनी उत्तरे देत शंकाचे निरसन केले आहे.
 
नव्याने सुधारीत आरक्षण जाहीर होताच सर्व प्रभागात बदल घडू शकतात, असे वाटले होते; परंतु तीनच प्रभागातील आरक्षणात बदल झाला आहे. आम्ही या बदलाचे स्वागत करुन जाहीर झालेले आरक्षण मान्य असल्याची प्रतिक्रिया नगरपंचायतीच्या प्रथम महिला माजी नगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी दिली आहे.