तळा तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

09 Oct 2021 15:00:30
borghar_1  H x
 
बोरघर / माणगांव | तळा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. शेकापचे जिल्हा चिटणीस ऍड.आस्वाद पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
 
तालुक्यातील पिटसई मुळगाव, पिटसई बौद्धवाडी, बोरबटला आदिवाशी वाडी, खांबिवली आदिवासी वाडी, महुरेबौद्ध वाडी, कुंभले कोंड, वानस्ते बौद्धवाडी या सर्व ग्रामस्थांनी आणि महिला मंडळी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला राम राम केला आहे.
 
मांदाड आगरी समाज राहटाड बौद्धवाडी, ग्रामस्थ खांबिवली धनगर वाडीसह सदर कार्यक्रमाला उपस्थित माणगाव येथील बाजार समितीचे सभापती निलेश थोरे, अलिबाग पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर, खरविली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सकपाळ, जेष्ठ सलागर महंमद परदेशी, कानू विचारे, दीपक शेठ रसाळ, हेमंत टिळक तसेच साळवी बाबा, राजा सोळंम, गोविंद हिरवे, नरेश मोरे, दिलीप लोखंडे,आरडीसी बँकेचे संचालक ज्ञानेश्वर भोईर, चंद्रकांत तळेकर, मुकुंद धामणकर, महादेव जगताप आदी उपस्थित होते. तळा तालुका चिटणीस धनराज गायकवााड यांनी सर्वांचे स्वागत केले.
Powered By Sangraha 9.0