पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ३२५ सफाई कामगारांना मिळणार मोफत घरे

पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव

By Raigad Times    20-Oct-2021
Total Views |
panvel_1  H x W
 
पनवेल | पनवेल शहरातील झोपड़पट्टी पुनर्वासन यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मजूर झालेल्या प्रकल्पाच्या योजनेतून पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या सफाई कामगारांना शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना मोफत घरे देण्याचा प्रस्ताव पालिकेकडून तयार आला आहे. या प्रस्तावावर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. या योजनेमार्फत ३२५ कामगारांना घरे अगदी मोफत मिळणार आहे.
 
पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर अवघ्या पाच वषारच्या कालावधीनंतर, नव्याने विकसित होणार्‍या पालिकेच्या ड्रीम प्रोजेक्ट्स पैकी आवास योजना ही आता साकारण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणार्‍या बाबी पूर्ण करण्यात आल्या असून हा प्रस्ताव पालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. या पंतप्रधान आवास योजने उभा करण्यात येणार्‍या सदनिका या झोपडपट्टी पुर्नवसनासाठी असणार्‍या आहेत. तसेच काही सदनिका या आता पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या ३२५ सफाई कामगारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. या कामगारांना अगदी मोफत घरे दिली जाणार आहे.
 
त्यासाठी २५ वर्षे सेवा ज्या कामगारांची झाली आहे आणि ही सेवा देतांना तसेच सेवा निवृत्तीच्या वेळेस जे कामगार मृत पावले आहेत. अशा पात्र मृतांच्या वारसांना ही घरे देण्यात येणार आहे. २५ वर्षे सेवा झालेल्या कामगारांना मालकी तत्त्वावर घरे देण्यात येणार आहे. तर २५ वषारपेक्षा कमी सेवा झालेल्या कामगारांना भाडे तत्त्वावर घरे देण्यात येणार आहे. हे भाडे २५ वर्षे सेवा पूर्ण झाल्यानंतर बंद होऊन ही घरे मालकीचे होणार आहे. ही मोफत घरे देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेचा वापर करण्यात येणार आहे.
 
या योजनेंतर्गत एका कामगारांच्या मागे पालिकेला ४ लाख २५ हजाराचा अनुदान मिळणार आहे. या अनुदानाव्यतिरिे येणारा खर्च पालिका स्वत:  करणार आहे. त्यामुळे पालिकेवर ९७१.२७ कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे. तसेच काही कामगारांना पंतप्रधान आवास योजनेमधून अडीच लाखाचे अनुदान मिळणार आहे. हा प्रस्ताव पालिकेकडून तयार करण्यात आला असून पालिकेच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. पालिकेच्या मंजुरीनंतर महाराष्ट्र शासन दरबारी अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.
 
२९६ चौरस फूटांची मोफत घरे
पनवेल महानगरपालिकेच्या सेवेत असलेल्या ३२५ सफाई कामगारांना पालिकेच्या माध्यमातून उभा करण्यात येणार्‍या पंतप्रधान आवास योजनेमध्ये २९६ चौरस फूट क्षेत्राच्या सदनिका डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजने अंतर्गत अगदी मोफत देण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेमार्फत काही नियमावली घोषित करण्यात आली आहे.
 
२५ वर्षे सेवा झालेल्या कामगारांना मालकी तत्वावर देण्याचा प्रस्ताव
पालिकेच्या सेवेत असलेल्या ३२५ सफाई कामगारांपैकी ४५ कामगारांना मालकी तत्त्वावर ही घरे देण्याचा प्रस्ताव आहे. तर २५ वषारपेक्षा कमी सेवा झालेल्या ५५ कामगारांना भाडेतत्त्वावर घरे देण्यात येणार आहे. या कामगारांची सेवा २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ही घरे त्याच्या मालकी हक्काची होणार आहे.
 
पालिकेवर पडणार ९७१.२५ कोटींचा आर्थिक बोजा
या योजनेंतर्गत १०० कामगारांना सदनिका देण्यात देणार आहे. त्यासाठी १३०० लाखांचा खर्च येणार आहे. त्यापैकी या सदनिकांना आवास योजनेमार्फत मिळणार्‍या ४.४५ लाखांचे अनुदान मिळणार आहे. या अनुदानामधून पालिकेला ३२८.८५ रुपयांचे अनुदान मिळणार आहे. ही र क्कम वजा करता ९७१.२५ कोटींचा आर्थिक बोजा पालिकेवर पडणार आहे.