इंधन, गॅस दरवाढीविरोधात अलिबागमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अभिनव आंदोलन

20 Oct 2021 15:20:46
gas_1  H x W: 0
 
अलिबाग | इंधन, गॅस दरवाढीविरोधात अलिबागमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने अभिनव आंदोलन केले. इंधन परवडत नाही म्हणून पुन्हा बैलगाडी हाकण्याची वेळ नागरीकांवर आली असल्याची संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष मनोज शिर्के यांनी व्यक्त केली आहे.
 
गेल्या पाच सात वर्षांत सातत्याने इंधनवाढ होत आहे. त्यामुळे सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या या करभाराविरोधात आणि इंधन दरवाढी विरोधात अलिबाग तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे अलिबाग पिंपळभाट येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यानी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून इंधन दरवाढी बाबत आपला निषेध व्यक्त केला.
 
gas_1  H x W: 0
 
पेट्रोल, डिझेल शंभरी पार तर गॅस हजार पर्यत पोहचला आहे. याचा परिणाम सर्वच वस्तुंवर होत आहे. कोंथींबीर जुडी शंभर रुपयांवर गेली आहे. हे पैसे शेतकर्‍याच्या खिशात गेले असते तर आनंद वाटला असता मात्र ते इंधनसाठी जात आहेत. गॅस दरवाढीने सर्वसामान्यांच स्वयंपाक घरातील बजेट बिघडले आहे. वाहनाला लागत असलेल्या इंधनाचे दर दिवसेंदिवस आकाशाला भिडत आहेत. त्यामुळे वाहन चालकांचेही बजेट बिघडले आहे.
 
वाढत्या इंधन दरवाढीमुळे पुन्हा बैलगाडी वापरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने बैलगाडीत मोटार सायकल टाकून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे, सुनिल गुरव, खरसांबळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0