वाकण-पाली-खोपोली महामार्गाचे काम कासव गतीने

19 Oct 2021 13:02:13
Untitled-1 copy_1 &n
 
सुधागड-पाली | वाकण-पाली-खोपोली रुंदीकरणाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असून या मार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पाऊस पडला की मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो तर ऊन पडले की धुरळा उडतो, अशी दुहेरी समस्या सतावत आहे. जवळपास १९८ कोटी खर्च करून राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम होत आहे.
 
या महामार्गावरुन प्रवास करताना प्रवाशांची मान, मणका, कमरेची हाडे खिलखिल्ली होतात. तर वाहने बिघडून न परवडणारा खर्च सोसावा लागतो आहे. पाली ते रासळ हा तीन किमी अंतरात सध्या खूप दुरवस्था झाली आहे. मार्गावरील मोठाल्या खड२ड्यात वाहने आदळून अपघात होण्याचा धोका आहे. या राज्यमार्गाचे काम केल्यास पाच वषारपासून सुरू आहे. मात्र अजूनही ते पूर्ण झालेले नाही. लॉकडाऊनपासून काम संथ गतीने सुरू आहे. अपूर्ण व अर्धवट असलेले काम, काही ठिकाणी खराब झालेला मार्ग, त्यामुळे प्रवासी वाहनचालक नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून संताप व्ये केला जात आहे.
 
वाकण पाली खोपोली महामार्गाचे संथ व अर्धवट कामामुळे अत्यंत त्रासदायक प्रवास करावा लागतो आहे. हा मार्ग सुस्थितीत करावा; अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष एमएसआरडीसीच्या विरोधात जनआंदोलन उभे करेल. - काशिनाथ ठाकूर, जिल्हा सरचिटणीस
Powered By Sangraha 9.0