अलिबागमध्ये गेल्या २४ तासांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

दिवसभरात १६२ रुग्णांची कोरोनावर मात

By Raigad Times    19-Oct-2021
Total Views |
Corona_1  H x W
 
अलिबाग । अलिबागकरांना दिलासा देणारी बातमी आहे. तालुक्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही. तर दुसरीकडे आज दिवसभरात एक, दोन नव्हे, तब्बल 162 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. तर 2 रुग्ण दगावल्याची नोंद झाली आहे.
 
आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 हजार 443 झाली आहे. यापैकी 602 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 19 हजार 704 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 137 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
 
आज (19 ऑक्टोबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे :
Alibag 1_1  H xAlibag 2_1  H x
Alibag 3_1  H x
Alibag 4_1  H x
Alibag 5_1  H x