अलिबाग : नागाव येथील मंदिरात चोरी; दानपेट्यांवर चोरट्याचा डल्ला

19 Oct 2021 18:05:07
Theft_Crime News_1 &
 
अलिबाग । अलिबाग तालुक्यातील नागाव गणपती आळी येथील दत्त मंदिरात चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिरातील दानपेट्यांवर डल्ला मारला आहे. एक दानपेटी चोरुन नेली. तर दुसरी दानपेटी फोडून त्यातील रोकड लंपास केली आहे.
 
2 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ ते 3 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती फिर्यादीने तक्रारीत दिली आहे. अज्ञात चोरट्याने नांगाव गणपती आळी येथील आरेकर मुरलीधर दत्त मंदीरात उघड्या दरवाजावाटे प्रवेश केला आणि दोन दानपेट्यांपैकी एक दानपेटी चोरुन नेली. तर दुसर्‍या दानपेटीचे लॉक तोडून त्यातील एकूण 700 रुपये रोख रक्कम लंपास केली.
 
याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञातावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वारगे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0