दिलासा! रायगडात आज 232 रुग्णांची कोरोनावर मात

दिवसभरात 47 नवे रुग्ण; 4 मृत्यूंची नोंद

By Raigad Times    19-Oct-2021
Total Views |
Raigad Corona Report_1&nb
 
अलिबाग । रायगड जिल्ह्यात आज (19 ऑक्टोबर) कोरोनाच्या 47 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 4 रुग्ण दगावले आहेत. तर दिवसभरात 232 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
 
आज पनवेल महापालिका हद्दीत 29, पनवेल ग्रामीणमध्ये 9, कर्जतमध्ये 1, पेणमध्ये 5, महाडमध्ये 1, रोह्यात 1, माणगावमध्ये 1 रुग्णाची नोंद झाली आहे. तर खालापूर, उरण, अलिबाग, म्हसळा, मुरुड, श्रीवर्धन, पोलादपूर, सुधागड, तळा या तालुक्यांमध्ये एकही नवा रुग्ण आढळून आलेला नाही.
 
आजअखेर रायगड जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 70 हजार 262 झाली आहे. यापैकी 1 लाख 64 हजार 976 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर मृतांचा आकडा 4 हजार 376 वर गेला आहे. सद्यस्थितीत 910 सक्रीय रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
 
आज (19 ऑक्टोबर) कोरोना पॉझिटीव्ह आलेल्या, कोरोनावर मात केलेल्या व मृत्यू झालेल्या रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे :

Raigad Corona Report_1&nb