पेण : कार-ट्रेलरची धडक; डोलवी येथील तरुणाचा मृत्यू

2 जण जखमी; खारपाले गावाजवळील घटना

By Raigad Times    18-Oct-2021
Total Views |
Pen kharpale accident_1&n
 
पेण (प्रदीप मोकल) | मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाले गावाजवळ कार आणि ट्रेलरची धडक होऊन झालेल्या अपघातात डोलवी येथील 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर अन्य दोनजण जखमी झाले आहेत. आज (18 ऑक्टोबर) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
 
वडखळ पोलीस ठाणे हद्दीतील खारपाले गावाजवळ ही दुर्घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला. या अपघातात कारमधील अभिषेक अमृत म्हात्रे (वय 23, रा. डोलवी, ता.पेण) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर देवेंद्र दत्तात्रेय गोखले (वय 27, रा.उत्कर्ष नगर पेण) व महम्मद फिरोज आलम (रा.वडखळ) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जे.जे. रुग्णालय मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.
 
या अपघाताची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास वडखळ पोलीस करीत आहेत.