श्रीवर्धन : न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये चोरी; लॉकर फोडून फीचे पैसे लंपास

17 Oct 2021 20:51:29
Theft Crime News Raigad_1
 
श्रीवर्धन । श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये चोरी झाली आहे. अज्ञात चोरट्याने शाळेच्या कपाटातील लॉकर फोडून फी चे पैसे चोरुन नेले. तसेच इतर साहित्याची तोडफोड करुन नुकसान केले आहे.
 
याप्रकरणी दिघी सागरी सागरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच ते 16 ऑक्टोबर दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोरट्याने न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश केला व मुख्याध्यापकांच्या रुममधील कपाटातील लॉकर फोडले.
 
लॉकरमध्ये ठेवलेली शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या फीचे 11 हजार रुपये चोरीला गेले असून, रुमधील मॉनिटर, सीपीयू, प्रिंटर, सीसीटीव्ही, डीव्हीआरची तोडफोड करुन नुकसान करण्यात आले आहे. ही घटना शनिवारी (16 ऑक्टोबर) उघडकीस आली.
 
याप्रकरणी दिघी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडी, चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सुखदेवे हे करीत आहेत.
 
Powered By Sangraha 9.0