रोहा : गावाच्या विकासासाठी भाजपा व शिवसेना एकत्र येण्याची गरज!

आम. प्रशांत ठाकुर यांचे रोह्यात प्रतिपादन

By Raigad Times    16-Oct-2021
Total Views |
1480a660-b54f-41a2-884c-8
 
भाजपा आणि शिवसेनेची नेतेमंडळी व्यासपीठावर आली एकत्र!
 
रोहा | ग्रामपंचायतीच्या विकासासाठी भाजपा व शिवसेना यांनी सोबत आलं पाहिजे यासाठी पुढाकार घेतला आहे. खऱ्या अर्थाने गेली कित्येक वर्ष आपण या ग्रामपंचायतीमध्ये संघर्ष करत असल्याचे प्रतिपादन पनवेलचे आम. प्रशांत ठाकूर यांनी रोहा येथे केले. रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय इमारतीचे उद्घाटन व आर.ओ.प्लँटचे भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजपा आणि शिवसेनेची नेतेमंडळी व्यासपीठावर एकत्र आली होती.
 
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, भाजपा उपाध्यक्ष रवी मुंडे, सतीश धारप, प्रशांत मिसाळ, संजय कोळकर मिलिंद पाटील, महादेव साळवी, रोठ बुद्रुक सरपंच नितिन वारंगे उपसरपंच वेदिका डाके, भाजपा युवक जिल्हाध्यक्ष अमित घाग, राजेश मपारा, तालुका अध्यक्ष सोफान जांभेकर, ग्रामस्थ व महिला मंडळ रोठ बुद्रुक ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थीत होते.
 
पुढे बोलताना आम. प्रशांत ठाकूर म्हणाले कि किती काळ आपण संघर्ष करायचे, ताकदीने दसपट असलेल्या प्रतिस्पर्ध्याशी लढायचं त्याच्यासाठी एकेक वीट उभी करावी लागते ती उभी करण्यासाठी प्रचंड कष्ट उपसणारे माजी सहकारी आणी युवा यांची मेहनत कामी आली आणी राष्ट्रवादीशी आपण ख-या अर्थाने कडवी झुंज देऊ शकलो. ज्या वेगानं या ग्रामसचिवालय इमारतीचं उद्घाटन झालं त्याच वेगानं जलशुद्धीकरण प्लांटचे भूमिपूजन केले. आरो प्लांट तोसुद्धा दर्जेदार पद्धतीने लवकरच बांधून लोकांच्या सेवेमध्ये सादर होईल. विकासाच्या दृष्टिकोनातून रोठ ग्रामपंचायत व या संपूर्ण परिसरामध्ये ज्या पद्धतीने भाजपा व शिवसेनाला राष्ट्रवादीशी कडवी लढत द्यावी लागली. रोहा तालुक्यात विकासासाठी शिवसेना आणी भाजपा एकत्र आलेली आहे. आगामी नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकित संगनमत झाले तर एकत्र येऊ शकतो असेही त्यांनी यावेळी अश्वस्थ केले.
 
b7853ced-8d38-423e-ac30-3
 
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समीर शेडगे यांनी रोठ ग्रामपंचायत छोटी असली तरी येथे काम करणेही सोपं नाही. धाटाव एमआयडीसीतील सर्वच निधी एका पक्षाकडे जातो, असे असताना रोठ ग्रा.पं. मध्ये ग्रामसचिवालयाची एवढी मोठी वास्तू आठ महिन्यांत उभी करणे साधी गोष्ट नाही. याठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वरुढ पुतळा उभारावा आणि एक प्रवेशद्वार सुसज्ज केल्यास कोणाचीही द्रिष्ठ लागणार नाही असे समीर शेडगे यांनी यावेळी सांगितले.
 
---------------------------------------------------------------------------------------
गावाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो, आमच्या पुढे विकासाची मोठी आव्हाने होती. रोठ बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुक आम्ही शिवसेना-भाजप युतीमध्ये निवडून आणली आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येऊन येथे विकासक राबवू. - नितीन वारंगे, सरपंच, रोठ बुद्रुक
-----------------------------------------------------------------------------------------
ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतर त्यामध्ये जवळजवळ दहा ते बारा विकास कामे जोमाने केली. यात शिवसेना आणी भाजपच्या आमदारांनी जो भरीव निधी दिला तो कामी आला. - अमित घाग, जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा.