श्री धाविर महाराजांचा पालखी सोहळा!

रायगड पोलिसांनी दिली सशस्त्र मानवंदना

By Raigad Times    16-Oct-2021
Total Views |
Untitled-1 copy_1 &n
 
सलामी सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी ; पालकमंत्री, खासदार, आमदारांची मंदिरात उपस्थिती!
 
रोहा | जिल्याचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराज यांच्या पालखी सोहळ्यास शनिवारी पहाटे मोठया उत्साहात सुरूवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने पोलिस निरीक्षक संजय पाटील व पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती, यावेळी पालकमंत्री, खासदार, आमदार आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. वेळेची मर्यादा आणि कोरोना संकटामुळे यंदा भाविकांना आरती न करता दुरूनच पालखीचे दर्शन घ्यावे लागले आहेत.
 
कोरोना पाश्वभूमीवर निर्बंध थोडे शिथील करण्यात आले असल्याने यंदा सलामीसोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली होती, यावेळी पालकमंत्री अदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, आम. अनिकेत तटकरे, आम. प्रशांत ठाकूर, प्रांताधिकारी यशवंतराव माने, उपविभागीय पोलिस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष

अ‍ॅड.

 प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष शैलेश कोळी, कार्यवाह भुषण भादेकर, नगराध्यक्ष संतोष पोटफोड़े, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, राज्य सरचिटणीस विजयराव मोरे, माजी नगराध्यक्ष समिर शेडगे, लालताप्रसाद कुशवाह, विश्वस्त नितिन परब, सुभाष राजे, समिर सकपाळ, आनंद कुलकर्णी, महेश सरदार, संदीप सरफळे, आप्पा देशमुख, अ‍ॅड. सुनिल सानप हेमंत कांबळे, अनिल भगत, नितिन पिंपळे, अमित घाग, अमित उकडे, राजेश काफरे, शैलेश रावकर, रविंद्र चाळके आदींसह देवस्थान ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

20211016_124120_1 &n
 
या उत्सवानिमित्त मंदिराचा संपुण परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होते, पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झाले होते. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मार्गस्त झाली.
शहरातील ठरलेल्या मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्तांना दर्शन देत महाराजांची पालखी मंदीरात परतते. यावेळी पून्हा महाराजांना पोलिस मनवंदना देण्यात येते, कोरोना पाश्वभूमी व वेळेच्या मर्यादेमुळे पालखीची दारोदारी होणारी आरती यंदा करता येणार नसुन केवळ फुलांची उधळण करीत रोहेकरांना पालखीचे दर्शन घ्यावे लागणार आहे.