मुरुड : बोर्ली मांडला पंचक्रोशीतील नुकसानग्रस्त अद्यापही मदतीपासून वंचित

शासनाच्या नाकर्तेपणा बाबत तीव्र नाराजी

By Raigad Times    16-Oct-2021
Total Views |
SHRI 1_1  H x W
 
कोर्लई | बोर्ली-मांडला पंचक्रोशीमध्ये मध्ये ढगफुटी सदृश अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन दिड महिना झाला तरी अद्यापही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित असून शासनाकडून नुकसान ग्रस्ताना तातडीने मदत देण्यात न आल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
 
सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यात सहा व सात तारखेला झालेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीने मुरुड तालुक्यातील बोर्ली मांडला भागात पुराचे पाणी घुसल्याने अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.मागील महिन्यात याबाबतचे एक निवेदन शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस मनोज भगत व बोर्ली ग्रामपंचायत सरपंच चेतन जावसेन यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मुरुड तहसीलदारांना देण्यात येऊन तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी.याबाबत निवेदन देण्यात आले होते.
 
दि.६ सप्टेंबर रोजी बोर्ली परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश अतिवृष्टीने अचानक आलेल्या पूरामुळे गावातील जूना स्टॅंड, जूना बाजार, मोहल्ला, मांडला भोईघर परिसरात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दि.७ सप्टेंबर २०२१ रोजी महसूल विभागाच्या टिम ने घरोघरी जाऊन पंचनामे करून देण्यात आले.पुरामुळे झालेले नुकसान अत्यंत वेदनादायी होते.
 
त्यावेळी गणेशोत्सव ऐन तोंडावर असताना अनेक व्यापा-यांनी दुकानात भरलेल्या सामानाचे पूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच बोर्ली खाडीत नांगरुन ठेवलेल्या बोटींचे,जाळ्यांचे नुकसान झाले.शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून सदर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.परंतु दिड महिना झाला तरी अद्यापही नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत देण्यात न आल्याने परीसरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.