माणगाव : तीन हजार दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघाला मंदिराचा परिसर

14 Oct 2021 17:42:26
20211013_203430_1 &n
 
अलिबाग | माणगाव तालुक्यातील नांदवी येथील स्वयंभू श्री आयजीमाता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. अष्टमी निमित्त बुधवारी रात्री दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 3 हजार दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला.
 
नांदवी गावच्या डोंगरावर निसर्ग रम्य वातावरणात हे मंदिर उभे आहे.बुधवारी अष्टमीनिमित्त मंदिरात होम हवन आयोजित करण्यात आला होता.यानिमित्ताने मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.रांगोळी काढण्यात आली होती.दुपारी महा आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देवीच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.
 
संध्याकाळी मंदिर आणि परिसरात दीपोत्सव आयोजित केला होता. 3 हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. या दीपोत्सवात ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दिव्यांच्या प्रकाशात मंदिर न्हाऊन निघाले होते.
Powered By Sangraha 9.0