पनवेल : गव्हाण कोपर येथे उद्या शासकीय दाखले वाटप शिबीर

11 Oct 2021 16:57:25
Dakhle Vatap_1  
 
पनवेल । आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार गव्हाण कोपर येथील छत्रपती शिवाजी हायस्कुलमध्ये उद्या, 12 ऑक्टोबर रोजी शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
 
रेशनकार्ड, उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, डोमासाईल, आधारकार्ड, वय व अधिवास, अशा विविध शासकीय दाखल्यांसाठी विद्यार्थी व नागरिकांना पनवेल तहसील कार्यालयात फेर्‍या माराव्या लागतात, अशा परिस्थितीत वेळ आणि आर्थिक भुर्दंड पडत असतो, त्यामुळे नागरिकांचा हा त्रास वाचविण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व नगरसेवक बबन मुकादम यांनी पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन शासकीय दाखले वाटप शिबीर आयोजित करण्याची मागणी केली होती.
 
त्या मागणीनुसार ग्रामीण व शहरी भागात सहा ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले. त्या अनुषंगाने खारघर, सुकापूर, कळंबोली, आजिवली व कामोठे येथे दाखले वाटप शिबीर पार पडले. गव्हाण कोपर येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये होणार्‍या या शिबिरामध्ये रेशनकार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमासाईल, वय व अधिवास दाखला, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, शालेय विद्यार्थ्यांसाठी आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती आदी सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.
Powered By Sangraha 9.0