बेलापूर येथील एटीएम फोडण्याचा प्रयत्न!

10 Oct 2021 18:41:46
ATM theft_1  H
 
पनवेल । सीबीडी परिसरातील चोरट्यांनी एटीएमला लक्ष्य केले असून, एटीएमची देखभाल दुरुस्ती करण्यार्‍या कंपनीचे एक्झिक्युटीव्ह यांना पाहणीदरम्यान हा प्रकार समोर आला. याबाबतची माहिती सीबीडी पोलीस ठाण्यात दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सीबीडी परिसरातील धाकटा खांदा पनवेल येथील राहणारे महेश पाटील हे हिताची पेमेंट सर्व्हिस प्रा.लिमिटेड या कंपनीमध्ये एक्झिक्युटीव्ह म्हणून काम करीत आहेत. पाटील हे या कंपनीमार्फत आयसीआयसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, एस बँकसह इतर बँकेच्या एटीएमच्या दुरुस्ती व देखभालीची कामे करतात.
 
सीबीडी परिसरातील एटीएमची पाहणी करीत असताना बेलापूर येथील अ‍ॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला. यावेळी एटीएम मशिनचे स्क्रीन व मशिनच्या दरवाजा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याचबरोबर मशिन फोडण्यासाठी दगड व लोखंडी वस्तू वापरण्यात आल्याचे समोर आले आहे.
 
दरम्यान, या घटनेची तक्रार सीबीडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी याबाबतचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Powered By Sangraha 9.0