माणगाव : नापास करण्याची धमकी देत, शिक्षकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार

By Raigad Times    06-Jan-2021
Total Views |
माणगाव : नापास करण्याची ध
 
अलिबाग : नापास करण्याची धमकी देत माणगाव येथील एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. त्याच शाळेवर कार्यरत असलेल्या मुलीच्या आईचीही नोकरी घालवण्याची धमकीही हा शिक्षक देत होता.
 
माणगाव तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेवर मदन वानखेडे हा शिक्षक म्हणून कार्यरत आहे. या शाळेत पीडित मुलगी शिकत असून तिची आईही शिक्षिका म्हणून नोकरी करीत आहे. मदन वानखेडे पीडित अल्पवयीन मुलीवर 2016 पासून अत्याचार करीत होता.
 
अखेर ही बाब मुलीने आईला सांगितल्यानंतर त्यांनी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात शिक्षक मदन वानखेडे याला अटक केली आहे. मदन वानखेडे हा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. दरम्यान, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना आहे.
 
पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
 
अखेर पीडित मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. माणगाव पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. माणगाव पोलिसांनी मदन वानखेडे याला अटक केली असून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या नावाने इंस्टाग्रामचे फेक अकाऊंट काढून मित्र मैत्रिणींमध्ये बदनामीचे मेसेज पाठवल्याचाही आरोप मदन वानखेडेवर ठेवण्यात आला आहे.