शेतकर्‍यांच्या जमिनी लाटणार्‍या दलालांची चौकशी करा

By Raigad Times    05-Jan-2021
Total Views |
Khopoli morcha 2_1 &
 
शेकाप नेते आ. जयंत पाटील यांची खोपोलीमध्ये मागणी
 
खोपोली । शेतकर्‍यांच्या अशिक्षित आणि गरीबीचा फायदा घेवून जमिनी विकत घेवून एमआयडीसी प्रकल्प उभारणीत मलीदा खाऊ पाहणार्‍या दलाल जमिनी घेतलेल्यांंच्या पैशाचा मूळ सोत्र काय त्यांच्याकडे पैसे आले तसेच उत्पन्न काय याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शेकापक्षाचे चिटणीस तथा आ. जयंत पाटील यांनी करीत खरीवली, गोठीवली, नंदनपाडा आजूबाजूच्या गावांच्या जागा संदर्भात राज्यशासनाने तहसिलदार यांकडे जनसुनावणी ठेवली असून ती रद्द करण्याचे प्रांताधिकारी यांना सांगितले आहे.

Khopoli morcha_1 &nb
 
खरीवली, गोठीवली, नंदनपाडा येथे प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्प उभारणी संदर्भात शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता हालचाली सुरू आहेत. शेतकर्‍यांनी आक्रमक पावित्रा घेतला असता आ. जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तहसिल कार्यालयावर बैलगाडीतून मोर्चा काढण्यात आला होता.
 
Khopoli morcha 3_1 &
 
यावेळी खालापूर पंचायत समिती सभापती वृषाली पाटील, सदस्य उत्तम परबळकर, कृषी उत्पन समितीचे सभापती विलास थोरवे, जिल्हा सहचिटणीस किशोर पाटील, तालुका चिटणीस संदीप पाटील, संतोष जंगम, अ‍ॅड. राजेंद्र येरूणकर, खालापूर नगरपंचायत उपनगराध्यक्षा शिवानी जगंम, खोपोली शहरचिटणीस अविनाश तावडे, नगरसेवक दिलीप जाधव, निजाममुद्दिन जळगावकर, केटीएसपी सदस्य दिनेश गुरव, दिलीप पोरवाल, अबू जळगावकर,अ‍ॅड. रामदास पाटील, प्रसाद तावडे, भुषण कडव, शेतकरी संघर्ष समितीचे किरण पाटील, अशोक पाटील, शांताराम पाटील, विष्णू पाटील, संजय पाटील, विनायक पाटील, महेश पाटील, धर्मराज वानखळे, सुरेश पाटील, मिलिंद दाभोलकर, जनार्दन खरीवले, गणेश नलावडे, राजू पाटील खालापूर नगरपंचायतीचे नगरसेवक, तालुक्यातील विविध भागातील कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
शेतकर्‍यांच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच वीस मिनिटे विधीमंडळात चर्चा करून त्यांकडून मी वधवून घेतले असल्याचे आ. जयंत पाटील यांनी सांगत आमच्या शेतकर्‍यांची जागा हवी असल्यास तहसिलदारांकडे जनसुनावणी न घेता गाव, वाड्यावस्त्यांवर बैठका घेतल्यास गावातील प्रमुख लोक व महिला आपले म्हणने मांडतील तसेच आमच्या शेतकर्‍यांची जागा हवा असल्यास औद्योगीक प्रकल्प सुरू करताना सिडकोचे नियम येथे लावले गेले पाहिजेत, औद्योगिक प्रकल्पाचा मोठा विस्तार होणार असल्याने जमिनीची किमंत दुप्पट होणार आहे.
 
त्यामुळे अगोदर ज्या शेतकर्‍यांनी विकल्या आहेत त्या मूळ शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, औद्योगिक प्रकल्प येत असतील तर येथे रोजगार कसा उपलब्ध करणार, त्यांची शैक्षणिक पात्रता काय असावी, मनुष्यबळ कसे लागेल याची माहिती देत आर्थिकदृष्टया कमकुवत असलेले लोक, आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांसाठी राज्यशासनाच्या वेगवेगळ्या फंडामधून ट्रेनिंग देण्यासाठी शेतकर्‍यांच्या मुलांसाठी शैक्षणिक हब सुरू करण्याचे निवेदन खालापूरचे तहसिलदार इरेश चप्पलवार यांना देत दिल्लीचा शेतकरी त्याच्या आधारकार्डवर आमची माळरानावरील जमिनी घेतो कशी याचीही चौकशीची मागणी जयंत पाटील यांनी करीत खरीवली, गोठीवली, नंदनपाडा येथील शेतकर्‍यांच्या पाठिशी रायगड जिल्हयातील शेतकरी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.