छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा सुशोभीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

05 Jan 2021 12:47:11
Panvel 1_1  H x
 
पनवेल । पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळील सुशोभीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. मावळे आणि हत्ती शिल्प लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून असे एकूण 22 शिल्प उभारण्यात आले आहेत.
 
Panvel 2_1  H x
 
पनवेल महानगरपालिका ही रायगड जिल्ह्यातील पहिली महापालिका आहे. रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या पनवेल शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील व सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी करून या संदर्भात सातत्त्याने पाठपुरावा केला. त्यानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून शिवाजी चौक येथील सर्वांचे आकर्षणाचे केंद्र बिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाचे सुशोभीकरण पूर्ण होत असल्याने शिवप्रेमींनी विशेष आनंद व्यक्त केला आहे.
 
रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कृष्ट तत्वज्ञान सांगणार्‍या व आचरणाच्या महात्म्याप्रमाणे ते वंदनीय थोर युगपुरुष. अशा या युगपुरुषाचा इतिहास तरुणांबरोबरच शिवप्रेमींना प्रेरणादायी ठरण्यासाठी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील आणि सत्ताधारीं पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी या विषयी सभागृहात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. आता महाराजांच्या पुतळ्याजवळील सुशोभीकरणाला वेग आला असून येत्या काही दिवसात सुशोभीकरणाचे काम पूर्ण होणार आहे.
Powered By Sangraha 9.0