जेएनपीटी । पेण तालुक्यातील आदीवासी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध उरण मधील गांधींचौक येथे रविवारी दि ( दि3) करण्यात आला. यावेळी विविध महिला संघटना सहभागी झाल्या होत्या यावेळी अत्याचारित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे ,महिला एकजुटीचा विजय असो असा नारा उपस्थित महिलांनी दिला. यामध्ये जनवादी महिला संघटना, शेकाप महिला संघटना यांचा समावेश होता.
जेएनपीटी बंदराचे ट्रस्टी भुषण पाटील यांनी पेण मधिल घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत, नराधमांला फाशीची देण्यात यावी अशी मागणी ही केली.यावेळी जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष हेमलता पाटील,रायगड जिल्हा अध्यक्ष ज्योती म्हात्रे,शेकाप महिला संघटनेच्या सीमा घरत, नाहिदा ठाकूर, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील अनेक महिला यावेळी सहभागी झाल्या होत्या. किसान सभेचे संजय ठाकूर,उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील,संतोष पवार याप्रसंगी भाषणे झाली. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती ही सांगण्यात आली.