पु. ना. गाडगीळ ज्वेलर्समध्ये चोरी करणारा कर्मचारी गजाआड

By Raigad Times    04-Jan-2021
Total Views |
पु. ना. गाडगीळ ज्वेलर्समध
 
पनवेल । पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स पनवेल येथे काम करणार्‍या कर्मचार्‍याने कामाच्या कालावधीमध्ये सोन्याची चोरी केली होती व तो पसार झाला होता. या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपीला सापळा रचून खारघर येथून अटक केली आहे.
 
आरोपीचे नाव अभिषेक चंद्रशेखर मालणकर रा. ऐरोली, ठाणे हे असून याने सन 2017 ते 2020 कालावधीत थोडे थोडे करून 310.500 ग्रॅम सोन्याचे दागीने व कॉईन चोरी केले होते. सदर गुन्ह्यातील आरोपीस गुन्हेप्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय बातमीदार व तांत्रीक तपास करून सदर आरोपीतास खारघर येथून ताब्यात घेऊन त्याने सन 2017 ते 2020 दरम्यान चोरी केलेले सोने पनवेल, भांडुप व झवेरी बाजार मुबंई येथे विकल्याचे सांगितल्याने सदर ठिकाणी जाऊन खालील प्रमाणे 100% सोने हस्तगत करण्यात करण्यात आले आहे. 9,31,500/- रुपये किमतीची 310.500 ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत केली आहे. सदर अटक आरोपीस आज दिनांक 4/01/2021 रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.
 
सदरची कारवाई शिवराज पाटील, रविंद्र गिड्डे, पनवेल विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व पोलीस निरीक्षक गुन्हे संजय जोशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल तारमळे, पोहवा विजय आयरे, वाघमारे, परेश म्हात्रे, सुनिल गर्दनमारे, यादवराव घुले, युवराज राऊत, राजू खेडकर, विनोद पाटील, गणेश चौधरी, पंकज पवार, साळुंखे यांनी केली. याबाबतचा अधिक तपास पोउपनिरी सुनिल तारमळे करीत आहेत.