रायगड जिल्हा शिक्षक मित्र मंडळाचा शैक्षणिक,सामाजिक उपक्रम

By Raigad Times    04-Jan-2021
Total Views |
mhasala edit 1_1 &nb
 
म्हसळा । रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये अद्यापन करित असलेले आणि म्हसळा तालुक्यातील विविध गावांतील प्राथमिक शाळेत सेवा केलेले गुरुजन वर्गाने आर.झेड.शिक्षक मंडळ स्थापण करून गेल्या 12 वर्षांपासून म्हसळा तालुक्यातील गावा गावात शैक्षणिक आणि सामाजिक सेवेचा उपक्रम करून आगळ्या वेगळ्या पद्धतीचा समाजपयोगी काम कार्यान्वित ठेवला आहे.मंडळाचे हे उपकृत कार्य मौलिक आसुन गोरगरीब मुलांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणादायी आहे.
 
तालुक्यातील शाळांमध्ये अद्यापनाची सेवा देत असताना शिक्षकांनी त्या त्या गावात जोडलेले ऋणानुबंध अधिक वृद्धिंगत होतात.शिक्षकांचे अशा प्रकारची केलेली सेवा स्मरणीय व आदर्शवत असल्याचे मनोगत रायगड जिल्हा शिक्षक पतपेढी उपाध्यक्ष नरेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
 
श्री दत्त जयंतीचे औचित्य साधून आय झेड शिक्षक मित्र मंडळातील सर्व सदस्यांनी म्हसळा तालुक्यातील लिपणीवावे,आमशेत,मरियमखार या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू देण्यात आल्या.कार्यक्रमाला सरपंच दगडू डांगे,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अर्जून बोर्ले,आमशेत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अपेक्षा अबगूल,वावे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मंदाताई लोखंडे, आमशेत केंद्राचे केंद्रप्रमुख इकबाल कौचाली आदी मान्यवर उपस्थित होते.याच वेळी वाघाव गावाच्या ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता मंडळाच्या वतीने 5000 लीटर क्षमतेची पाणी साठवण टाकी लोकार्पण सोहळा संपन्न झाला.या वेळी सरपंच अंकुश खडस,मुंबई ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सतिश बामणे, अनंत पाष्टे उपस्थित होते.आय. झेड शिक्षक मित्र मंडळ रायगड यांच्यावतीने म्हसळा तालुक्यात मागील 12 वर्षांपासून विविध लोकपयोगी विधायक कार्य पार पाडले जात आहेत त्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष रमेश थवई आणि सर्व शिक्षक सदस्यांचे ग्रामस्थांनी आभार मानुन धन्यवाद दिले.