मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरु
पनवेल : पनवेल शहरातील गांधी हॉस्पिटलजवळील ब्रीजखाली एका इसमाचा मृतदेह सापडला आहे. या मृताची ओळख अद्याप पटलेली आला नसून पनवेल शहर पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
ब्रीजखाली मृतावस्थेत साडपलेल्या व्यक्तीचे अंदाजे वय 50 ते 55 वर्षे असून उंची 5 फूट 4 इंच, रंग सावळा, अंगाने सडपातळ, डोक्याचे व दाढीचे केस बारीक काळे पांढरे, नाक सरळ, चेहरा उभट आहे. त्याने अंगात हिरव्या रंगाचा टी-शर्ट त्यावर पांढर्या रंगाच्या आडव्या पट्ट्या तसेच डाव्या बाजूस जी-91 असे प्रिंट केलेले आहे व त्याने खाकी रंगाची बर्मुडा पँट घातलेली आहे.
अशा वर्णनाच्या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे येथे 022-27452333 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे यांनी केले आहे.