मुरुड तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

By Raigad Times    22-Jan-2021
Total Views |
Murud Reservations_1 
 
कोर्लई । मुरुड तालुक्यातील 24 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदाचे आरक्षण ठरविण्यासाठी पंचायत समिती सभागृहात शुक्रवार (दि.22) जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांनी सभेचे आयोजन केले होते. यावेळी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 
सुरुवातीला सर्व उपस्थितांचे स्वागत करण्यात करण्यात येऊन मुरुड तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सन. 2021 ते सन.2025 या कालावधीसाठी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 च्या तरतुदी नुसार आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी शारदा पोवार यांनी सांगितले.यावेळी आरक्षण सोडतीसाठी आवश्यक असलेली आकडेवारी मुंबई ग्रामपंचायत निवडणूक नियम 1964 मधील तरतुदीनुसार माहिती देण्यात आली. तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा प्रवर्ग यातील महिलांसह व सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षण ठरविण्याची कालबद्ध चक्रानुक्रम याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली.
 
सदर आरक्षणाबाबतच्या तरतुदी चिठ्ठ्या टाकून प्रथम प्रशांत धुळे (वय 8 वर्षे) या लहान मुलाला चिठ्ठ्या काढण्यास सांगण्यात आले व त्यानुसार तालुक्यातील आरक्षण घोषित करण्यात आले.सर्व प्रवर्गाचे आरक्षण तपशील सर्व उपस्थितांना देण्यात आले.तसेच उपस्थितांचे आरक्षणाबाबत असणा-या शंकांचे निरसन त्याच ठिकाणी करण्यात आले.त्यानंतर आरक्षणासाठी वापरण्यात आलेल्या चिठ्ठ्यांवर नोंदी ठेऊन स्वाक्षरी करून सदर चिठ्ठ्या एका लखोट्यामध्ये मोहोर बंद करण्यात आल्या.
 
यामध्ये अनुसूचित जाती खुला मांडला, अनुसूचित जमाती खुला विहूर, मिठेखार, महिला आंबोली, शिघ्रे, तेलवडे, नागरिकांचा मागासप्रवर्ग खुला मजगांव, भोईघर, साळाव, महिला वावडुंगी, उसरोली, कोर्लई, सर्वसाधारण खुला काशिद, काकळघर,तळेखार, नांदगाव, सावली, आगरदांडा, महिला वळके, एकदरा, बोर्ली, चोरढे, वेळास्ते, राजपुरी ग्रामपंचायत निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले.
 
तहसीलदार गमन गावित, नायब तहसिलदार रविंद्र सानप, महसूल नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, प्रविण वरंडे, दर्शना कांबळे, केतन भगत, सुभाष वाणी, संजय शेडगे, सचिन मुनेश्वर, सुनील वानखेडे, दिनेश वारगे, संतोष पवार, मयुरेश गद्रे, धिरज भगत, संदेश वाळंज, संजय गाडे व कर्मचारी उपस्थित होते.