सुधागड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर

By Raigad Times    22-Jan-2021
Total Views |
Sudhagad Reservation_1&nb
16 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित
 
पाली/बेणसे । सुधागड तालुक्यातील 33 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण आज (दि.22) पालीतील भक्तनिवास क्रमांक 1 येथे जाहीर करण्यात आले. यामध्ये 16 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. जवळपास निम्म्या ग्रामपंचायतींवर महिलांचे अधिराज्य गाजणार आहेत.
 
रोहा उपविभागीय अधिकारी यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली पाली तहसीलदार दिलीप रायन्नावार, नायब तहसीलदार डी.एस.कोष्टी व वैशाली काकडे याबरोबरच सर्व पक्षाचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य व शासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत आरक्षण पदाची सोडत काढण्यात आली.
----------------------------------------------------------------------------
 
असे आहे आरक्षण....
 
अनुसूचित जातीसाठी माणगाव बुद्रुक. ही एकमेव ग्रामपंचायत आरक्षित झाली आहे. अनुसूचित जमातीमध्ये 11 जागा आरक्षित असून 11 पैकी 5 जागा महिलांसाठी राखीव तर 6 जागा या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत. यामध्ये सिद्धेश्वर बुद्रुक, गोमाशी, शिलोशी, आतोणे व अडूळसे या महिलांसाठी राखीव तर चंदरगाव, हातोंड, दहिगाव, जांभुळपाडा, तिवरे व नवघर या ग्रामपंचायती प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत.
 
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
 
9 पैकी 4 जागा महिला राखीव. यामध्ये महागाव, खाडपोली, आपटवणे व पाच्छापुर या महिलांसाठी तर घोटवडे, नांदगाव, उद्धर, भार्जे व नाडसुर या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत.
 
खुला प्रवर्ग 12 पैकी 7 जागा महिलांसाठी राखीव
 
राबगाव, रासळ, कुंभारशेत, नागशेत, परळी, ताडगाव, व कळंब या महिलांसाठी राखीव तर वाघोशी, खवली, चिवे, नेणवली व चिखलगाव या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत.