कोकणासह राज्यात पावसाची शक्यता

By Raigad Times    22-Jan-2021
Total Views |
IBD_1  H x W: 0
 
हवामान विभागाचा अंदाज: आंबा,काजू पीकाच्या नुकसानीची शक्यता
 
मुंबई : कोकणासह राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदाजाप्रमाणे खरंच पाऊस पडला तर बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
 
राज्यात ५ ते ११ फेब्रुवारी दरम्यान, कोकणात पावसाळी वातावरण असेल. या पावसाळी वातावरणामुळे शेतीला धोका पोहोचण्याची अधिक शक्यता आहे. सध्या आंबा आणि काजू पिकासाठी वातावरण आहे. मात्र, पाऊस पडला तर या पिकाला मोठा धोका निर्माण होणार आहे.
 
आंबा, भाजीपाला आणि इतर पिकांवर तुडतुडा आणि भुरी रोगाचा धोका पोहोचण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडील पट्ट्यात आणि दक्षिण टोकाला काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे.