नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा शेकापकडून सत्कार

21 Jan 2021 13:25:12
edit 1_1  H x W
 
अलिबाग | नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या आणि अलिबाग, पेण आणि रोहा तालुक्यामधील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांचा बुधवारी (२० जानेवारी) शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला.
 
रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या केंद्रीय कार्यालयाच्या पटांगणातील या कार्यक्रमाला शेकाप नेते माजी आमदार धैर्यशिल पाटील, माजी आमदार पंडित पाटील, कार्यालयीन चिटणीस ऍड राजेंद्र कोरडे, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, सुरेश खैरे, औरंगाबादचे जिल्हा चिटणीस काका शिंदे, जिल्हा चिटणीस ऍड आस्वाद पाटील, महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, समाजकल्याण सभापती दिलीप भोईर, जिप सदस्या भावना पाटील, चित्रा पाटील, माजी सदस्य संजय पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, ऍड प्रसाद पाटील, उपनगराध्यक्षा ऍड मानसी म्हात्रे, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, अनंतराव देशमुख, तालुका चिटणीस अनिल पाटील, शहर चिटणीस अशोक प्रधान, उपस्थित राहणार आहेत.
 
 नवीन वर्षातील शेतकरी कामगार पक्षाचा पहिला कार्यक्रम असल्याने मोठया संख्येने शेकापक्षाचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. अत्यंत सुत्रबद्धरित्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण परिसर लाल बावटयाने लाल झाला होता. प्रवेशद्वारावर बँडबाजा वाजवत फटाक्यांची आतषबाजी करीत विजय साजरा केला जात होता.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील पुढे म्हणाले की, राजकारणात नेहमी डोळयात तेल घालुन काम करावे लागते. आपला पराभव नक्की झाला पण कधीच फसवणूक केली नाही. पहिल्यांदाच गाफिल राहीलो. पण या पराभवातून लोकांच्याही आपला आणि विरोधकांमधला फरक लक्षात आला. आपली ताकद आपली प्रेरणा आपल्या वकृत्वातून, प्रामाणिकपणा आहे. लढावू कार्यकर्त्यांचा मला अभिमान वाटतो. ज्यांनी आपल्या पडत्या काळातही जिल्ह्यातून साडेचार लाख मते मिळवून दाखवली. आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पाच पाच वेळा निवडून दिले जाते. त्यांची ताकद, आणि जनतेचा असणारा विश्‍वास यामुळेच हे शक्य असल्याचा विश्‍वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
 
IMG-20210120-WA0055.jpg_1
 
भविष्यात आपल्याला वेगळी भुमीका घेऊन काम करायचे आहे. अपमानाचा बदला घेण्याची जिद्द, आपली ताकद दाखवून दिली. पेणच्या इतिहासात खारेपाटात पहिल्यांदा पंचायतींमध्ये विजय मिळवला. खारेपाटातील परिवर्तन कार्यकर्त्यांनी करुन दाखविले. कोरोना काळात सर्व पक्ष घरात बसले असताना शेकापक्षाने घरोघरी जाऊन मदत केली. हे काम जनता विसरत नाही. खरी कॉंग्रेस विचारांसोबत ठाम राहिल्याने त्यांना यावेळी जयंत पाटील यांनी धन्यवाद देताना दिलेले आश्‍वासन आम्ही विसरणार नसल्याची ग्वाही दिली. नेत्यांपेक्षा कार्यकर्त्यांमुळे मिळालेला विजय स्फुर्तीदायक असल्याचे आवर्जून जयंत पाटील यांनी सांगितले. शेकापक्षाच्या या विजयाने विरोधक हबकून गेले आहेत. हा रायगडचा इतिहास आहे. विधानसभेतला पराभवाची कारणमिमांसा करताना आ. जयंत पाटील म्हणाले की, शेकापक्षाचे तत्वज्ञान तरुणांपर्यंत पोहचले नाही. शेकापक्षाचा इतिहास, चळवळ, लढा विकासकामे, दिलेला रोजगार याचे मुल्यमापन करायला आपण कमी पडलो. त्यामुळे तरुणांना तत्वज्ञान सांगण्याची गरज आहे.
 
 सोशल मिडियाकडे दुर्लक्ष केले. नेटवर्क उभे करुन शकलो नाही याची प्रांजल कबूली दिली. प्रत्येक गावात वैचारिक कार्यकर्ता उभा केला पाहिजे. हे करताना गरीबाबरोबरची बांधिलकी कायम जपली पाहिजे.मित्रपक्षाला धन्यवाद देताना जयंत पाटील म्हणाले की, मित्रपक्षामुळे जातीयवादी शक्ती वाढवण्या विरोधात भुमिका घेऊन सहकार्य केल्याबद्दल कॉंगेसला त्यांनी धन्यवाद दिले. आपल्या भाषणा दिवंगत कॉंग्रेस नेते बॅ अंतुले यांचा आवर्जून उल्लेख करताना त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी दिलेले योगदान कधी विसरता येणार नाही. आपला विचार धर्मनिरपेक्ष आहे, तो जगला पाहिजे, कायम राहिला पाहिजे. धर्माचे राजकारण थांबले पाहिजे. अन्यथा उद्या हिंदू धर्मात देखील जातीजाती मध्ये युद्ध होतील अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्याला कोणाला हिणवायचे नाही, कोणाला डिवचायचे नाही तर आपले काम करुन आपली मते मिळवायची आहेत. आपले काम पाहून मतदार आपल्या मागे धावून येेईल असे सांगत मतदारांची पाच वर्षे सेवा करण्याचे आवाहन केले. हा विजय पुढल्या आमदारकी आणि जिल्हा परिषदेच्या विजयाची सुरुवात आहे. त्यासाठी त्वेषाने काम करु या असे आवाहनही शेवटी आ. जयंत पाटील यांनी केले. 
 

IMG-20210120-WA0055.jpg_1
 
आजचा विजय उद्या पुन्हा रायगड जिल्ह्यावर पुन्हा लाल बावटा दिमाखाने फडकवण्याचा आपला निर्धार आहे. आजचा विजय हा उदया हा जिल्हा लाल बावटयाचा जिल्हा आहे हे दाखवून देण्याचा दिवस आहे. गेल्या खेपेला जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य आपण निवडून आणू देऊ पुन्हा त्याच त्वेषाने, त्याच हिंमतीने त्याच जिद्दीने आपल्याला पुढले काम करायचे आहे. आणि मला खात्री आहे पेण आणि अलिबाग अभेद्य बालेकिल्ले आहेत ते पुन्हा प्रस्थापित करुन आपण वेगळी भुमीका महाराष्ट्राला दाखवून देऊ. डाव्या चळवळीचे केंद्रबिंदू म्हणून आज आपण महाराष्ट्राचे नाव पुर्नजिवीत करुन नेटाने काम करु या असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
 - आ. जयंत पाटील
 
-----------------------------------------------------------------------------------------
 
पक्षाला नवी सुरुवात निकालाने दाखवली - धैर्यशिल पाटील
यावेळी मार्गदर्शन करताना शेकापक्षाचे नेते माजी आमदार धैर्यशिल पाटील म्हणाले, की राजकारण सातत्याने बदलत असते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. शेकापक्षाच्या आयुष्यात असे कमी प्रसंग आले नाहीत. अनेक पराभव यापूर्वीही पचवले आहेत. या पराभवानेच पुन्हा विश्‍वास जागृत केला. विरोधकांनी शेकापक्ष संपला हे घोषीत केले. मात्र अंताच्या पुढे पुन्हा नव्याने सुरुवात असते ती सुरुवातच या निकालाने दाखवली. त्यामुळेच पेण तालुक्यात पैकीच्या पैकी निवडणूका जिंकून दाखवल्या. जनतेने नाकारल्याचे कारण शोधून काढल्यानंतरच पैकी निकाल मिळवले. नवीन वर्षातील दमदार पाऊल ग्रामपंचायत निवडणूकीत टाकले आहे. भविष्यात असे अनेक पावले टाकावे लागतील. त्यासाठी कष्टाने चालणे अपरिहार्य आहे. न थांबता चालावे लागेल. थांबलो तर पाठीमागचे आपल्याला तुडवून पुढे जातील हे लक्षात ठेवा असेही त्यांनी शेवटी बजावले.
 
IMG-20210120-WA0048_1&nbs
प्रस्तावना करताना शेकापक्षाचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस तथा नगरपरिषद गटनेते प्रदीप नाईक यांनी शेकापक्षाच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले, शेकापच्या कार्यकर्त्याला विजयाने कधी गर्व होत नाही. आणि पराभवाने खचत नाही. ग्रामपंचायत निवडणूकीत शेकापक्षाने आपले स्थान कायम राखले आहे. कार्यकर्ते आणि स्थानिक नेतृत्वाने परिश्रम घेतल्यानेच हे साध्य होऊ शकले. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणूकीला सामोर जात चांगले यश संपादन करु असा विश्‍वासही प्रदीप नाईक यांनी व्यक्त केला. सुत्रसंचलन व आभाप्रदर्शन संदीप जगे यांनी केले.
 
यावेळी पेण तालुक्यातील वाकु्रळ, कामार्ली, आंबेघर, बोर्झे, काळेश्री, जोहे, खारपाले, अलिबाग तालुक्यातील सासवणे, पेझारी, वाघोडे आणि मान तर्फे झिराड तर रोहा तालुक्यातील महाळूंगे, शेणवई, वावे पोटगे, शेडसई आदी ग्रामपंचायतीमधील विजयी सदस्य तसेच उमेदवारांचाही सत्कार आ. जयंत पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला
 
सलग सातव्यांदा ग्रामपंचायमीमध्ये निवडून येण्याचा मान पटकावणारे पेण तालुक्यातील जोहे ग्रामपंचायतीचे काशिनाथ जनार्दन पाटील, सासवणे ग्रामपंचायतीतील पाचव्यांदा विजय मिळविणारे संतोष महादेव गावंड, सहाव्यांदा विजय मिळविणारे मान तर्फे झिराडमधले जयेश भास्कर पाटील, तर पाचवेळा विजय मिळवून सहाव्यांदा निसटता पराभव झालेल्या प्रफुल्ल लक्ष्मण म्हात्रे या बहाद्दर शिलेदारांचा विशेष सत्कार करण्यात आला.
 

IMG-20210120-WA0053_1&nbs
 
पंजाबच्या शेतकरी आंदोलनाला लाल सलाम- आ. जयंत पाटील
आ. जयंत पाटील यांनी आपल्या भाषणा आवर्जून पंजाब येथील शेतकर्यांच्या आंदोलनाचा उल्लेख केला. २५ जानेवारी रोजी आझाद मैदानात २५ हजार शेतकरी जमवून पंजाबच्या आंदोलनाला साथ दयायची आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही या आंदोलनाला सक्रीय पाठिंबा मिळणार आहे. देशातला केंद्रबिंदू शेतकरी असताना त्यालाच उध्वस्त करण्याचे अन्यायी धोरण सांप्रतचे सत्ताधारी राबवित आहेत. तीन काळे कायदे संपूर्णपणे रद्द झालेच पाहिजेत ही आपली भुमीका आहे. दिल्लीतील लढाई व्यापक होईल. यावेळी आंदोलक शेतकर्यांचे जयंत पाटील यांनी कौतुक करीत त्यांना लाल सलाम केला. या आंदोलनाच्या निमित्ताने ना ना पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या चरीच्या संपाची आठवण करुन दिली. चळवळीचा इतिहास निर्माण केला तर तो अनेक वर्षे लोक लक्षात ठेवतात याची आठवण त्यांनी यानिमित्ताने केली.
Powered By Sangraha 9.0