कर्जत तालुक्यातील 52 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत

By Raigad Times    21-Jan-2021
Total Views |
karjat sarpanch_1 &n
 
कोल्हारे ग्रामपंचायत मधील सरपंच आरक्षणाबद्दल बौद्ध समाजाकडून आक्षेप
  
कर्जत : तालुक्यातील 52 ग्रामपंचायत मधील 2021 ते 2026 या कालावधीसाठी सरपंच पदांचे आरक्षण आज 21 जानेवारी रोजी काढण्यात आले.प्रांत अधिकारी वैशाली परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली कर्जत पंचायत समितीच्या कार्यालयात झालेल्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडत काढण्यात आली.त्यात अनुसूचित जमाती साठी 17 सरपंचपदे तर 15 सरपंच पदे ही नागरिकांचा मागासप्रवर्ग तसेच अनुसूचित जाती साठी दोन ग्रामपंचायत आरक्षित ठेवण्यात आली.
 
15 जानेवारी रोजी निवडणूक झालेल्या नऊ ग्रामपंचायत मध्ये जिते,भिवपुरी या दोन ग्रामपंचायतसाठी अनुसूचित जमाती महिला राखीव तर हुमगाव आणि कडाव मध्ये अनुसूचित जमातीसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.तर दामत ग्रामपंचायतमधील सरपंच पद हे सर्वसाधारण झाले असून साळोख तर्फे वरेडी,वैजनाथ,पोशिर या तीन ग्रामपंचायत मध्ये सर्वसाधारण महिला यांच्यासाठी राखीव कोल्हारे ग्रामपंचायत मध्ये सरपंच पद नागरिकांचा मागासप्रवर्ग साठी राखीव ठेवण्यात आले आहे.आज काढण्यात आलेल्या सरपंच आरक्षणमध्ये 52 पैकी तब्बल 26 ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच विराजमान होणार असून नुकत्याच निवडणूक झालेल्या नऊ पैकी पाच ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच विराजमान होणार आहेत.
 
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कर्जत प्रांताधिकारी वैशाली परदेशी आणि कर्जत तहसिल विक्रम देशमुख्य यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत घेण्यात आली. लोकसंख्येनुसार पहिल्यांदा एस.सी साठी कर्जत तालुक्यातील रजपे आणि बीड बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षित करण्यात आले
 
तसेच उरलेल्या 21 ग्रामपंचायतीमधून नेरळ आणि वैजनाथ ग्रामपंचायत सर्वसाधारण महिला साठी आरक्षित करण्यात आल्या आणि त्यानंतर लहान मुलीने 9 ग्रामपंचायतीनच्या चिठ्या काढून त्या काढलेल्या 9 ग्रामपंचायत सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आणि उलेलेल्या ग्रामपंचायती या सर्वसाधारण साठी आरक्षित करण्यात आल्या अशा प्रकारे ग्रामपंचायत सरपंच पदांची सोडत व काढण्यात आली. परंतु या सोडती मध्ये अनेक नवनिर्वाचित सदस्यांनी हरकत घेतल्याची पाहायला मिळाली आणि ते जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले.
 
संदीप मोरे यांच्या म्हणण्यानुसार कोल्हारे ग्रामपंचायतची स्थापना 1966 मध्ये झाली असून आतापर्यंत एकदाही अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तीला सरपंच पदावर विराजमान होता आले नाही.आम्हाला एकदाही सरपंच पदांचे आरक्षण दिले नसल्याने आमच्या ग्रामपंचायत मधील सरपंच पद हे अनुसूचित जाती मधील कोणत्याही व्यक्तीला सरपंच होता आले नाही.संदीप मोरे यांचा त्यासाठी सरपंच पदाबद्दल आक्षेप असून कोल्हारे ग्रामपंचायत मधील बोपेले आणि धामोते या महसुली गावात मोठ्या प्रमाणात अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे.त्यामुळे 2015 मध्ये सरपंच पदांचे आरक्षण काढण्यात आले त्यावेळी अनुसूचित जाती आरक्षण काढण्यात आले,त्यावेळी कोल्हारे ग्रामपंचायत ही अनुसूचित जाती साठी आरक्षणाच्या तक्त्यात तिसऱ्या क्रमांकावर होता.त्यात मावळत्या कडाव आणि जिते ग्रामपंचायत मध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण होते.पण कोल्हारे ग्रामपंचायत मध्ये नव्याने पडलेले सरपंच पदांचे आरक्षण नागरिकांचा मागासप्रवर्ग साठी राखीव झाले आहे,त्यामुळे आक्षेप येत आहेत. 
15 जानेवारी 2021 रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण
 
1) पोशीर- सर्वसाधारण महिला
2) सालोख तर्फे वरेडी-सर्वसाधारण महिला
3 जिते- अनुसूचित जमाती महिला
4) कोल्हारे- ना. मा. प्र. खुला
5) दामात- सर्वसाधारण पुरुष
6)हुमगाव - अनुसूचित जमाती पुरुष
7) कडाव ना मा प्र पुरुष
8)भिवपुरी - अनुसूचित जमाती महिला
9) वैजनाथ- सर्वसाधारण- महिला