भर रस्त्यात एसटी पडली बंद; अडिच तास खोळंबा

By Raigad Times    21-Jan-2021
Total Views |
ST bus _1  H x
 
  • प्रवासी वैतागले, वाहतूकही झाली होती ठप्प
  • पाली येथील घटना
गौसखान पठाण/सुधागड-पाली । पुणे-रोहा एसटी आज (21 जानेवारी) सकाळी टायर पंक्चर झाल्याने पाली बस स्थानकाच्या अलिकडे भर रस्त्यात बंद पडली. त्यानंतर टायर बदलण्यास तब्बल अडीच तास लागल्याने गाडीतील प्रवासी वैतागले होते. तर दुसरीकडे या मार्गावरील वाहतूकदेखील ठप्प झाली होती.
 
पुण्यावरुन रोह्याला जाणारी ही एसटी आज सकाळी 10:30 वाजता पालीत दाखल झाली होती. मात्र बस स्थानकाच्या अलिकडेच भर रस्त्यावर एसटीचा टायर पंक्चर झाला. टायर काढण्यासाठी बराच वेळ जॅक लागत नव्हता. त्यानंतर अथक परिश्रमाने जॅक चढवून टायर काढण्यात आला व नवीन टायर बसविण्यात आला. तोपर्यंत दोन ते अडीच तास उलटून गेले होते. यावेळी येथील नागरिक संदीप सिलिमकर व इतर नागरिकांनी टायर बदलण्यासाठी सहाय्य केले.

ST bus _1  H x  
 
भर रस्त्यात एसटी बंद पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. तर एसटीतील प्रवासी खोळंबून पडल्याने चांगलेच वैतागले होते. यावेळी काय झाले हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी झाली होती.