माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींचे सरपंचपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

By Raigad Times    21-Jan-2021
Total Views |
file photo_1  H
 
माणगाव । माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींच्या सन 2021 ते 2025 करिता सरपंचपदासाठीची आरक्षण सोडत गुरुवार दि.21 जानेवारी रोजी तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी जाहीर केली.
 
माणगाव प्रशासकीय भवन येथील सभागृहात याबाबत तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली व परी. सहा.जिल्हाधिकारी तथा तहसीलदार माणगाव मैनाक घोष यांच्या उपस्थितीत हि सोडत जाहीर करण्यात आली.
 
माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी : खुला 2 जागा करंबेळी व पानसई, महिला 
अनुसूचित जमातीसाठी : 2 जागा नांदवी व काकल, खुला गट : 4 जागा गांगवली, कोस्ते खुर्द, रातवड, मुठवली, महिला : 3 जागा भागाड, निळज, पोटणेर, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीः  खुला 10 जागा अम्बर्ले, भाले, गोवेले, होडगाव, पळसप, पाटणूस, कुमशेत, डोंगरोली, शिरसाड, गोरेगाव, महिला 10 जागा मंगरूळ, वावेदिवाळी, पळसगाव बु., जिते, टोळ खु., तळेगाव तर्फे गोरेगाव, निजामपूर, रवाळजे, लाखपाले, वडगाव, सर्व साधारण आरक्षित जागेसाठी खुलाः 21 जागा साले, लोणशी, वारक, दहिवली कोंड, साळवे, सुरव तर्फे तळे, पन्हळघर खु., लोणेरे, पन्हळघर बु., पेण तर्फे तळे, साजे, वडवली, खरवली, देवळी, भुवन, मांजरवणे, चिंचवली, नागाव, न्हावे, शिरवली, मोर्बा, महिलासाठी : 22 जागा सणसवाडी,कडापे, विहूले, दाखणे, हरकोल, देगाव, साई, कवीलवहाल बु., बामणोली, चांदोरे, पुरार, पहेल, वणीमलई कोंड, उणेगाव, दहिवली तर्फे गोवेले, कुंभे, मढेगाव, फलाणी, टेमपाले, वरची वाडी, विळे, तळाशेत अशा प्रकारे ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.